‘कोल्ह्यांनी स्वतः वाघ असल्याचा बनाव सुरु केलाय’ – सुषमा अंधारे

अतुल परदेशी
मुख्य संपादक
१४ ऑगस्ट २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांनी दादरमध्ये प्रतिसेनाभवन उभारण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आमने-सामने उभे राहिले आहेत. यावरून आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांना चांगलच फैलावर घेतलं आहे. ‘कोल्ह्यांनी स्वतः वाघ असल्याचा बनाव सुरु केलाय’ अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.”प्रतिसेनाभवन उभारण्याची भाषा करणाऱ्या लोकांबद्दल मला अपार सहानुभूती वाटते.

डूप्लिकेट डूप्लिकेटचा खेळ खेळता-खेळता सत्य आणि भ्रम यातला फरक विसरून कोल्ह्यानी स्वतः वाघ असल्याचा बनाव सुरु केलाय. अर्थात् लांडग्यांच्या कळपात गेल्यावर हे बोलणं स्वभाविक आहे”. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजप यांना जोरदार टोला लगावला आहे.प्रतिसेनाभवन या नावावरून वाद सुरु झाल्यानंतर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन एकनाथ शिंदे करत आहेत हा गैरसमज पसरवला जात आहे. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवन बद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील”. असं सामंत म्हणाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *