या पाच कारणांमुळे बावनकुळे झाले प्रदेशाध्यक्ष व त्यांनी मारली बाजी

अतुल परदेशी
मुख्य संपादक
१३ ऑगस्ट २०२२


१.चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते पक्षाशी एकनिष्ठ तर आहेतच पण विदर्भात त्यांच्या कामाचा ठसा आहे. शिवाय त्यांच्या रुपाने भाजपाला प्रदेश अध्यक्ष मिळाले तर ओबीसी समाजामध्ये देखील वेगळी भावना निर्माण होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बावनकुळे अॅक्टीव झाले असून विरोधकांचे मुद्देही ते खोडून काढत आहेत.

२. पक्षाबरोबर एकनिष्ठा तर आहेच पण बावनकुळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात. त्यामुळेच त्यांचे विधानपरिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात आले होते. विधानपरिषदेसाठी अनेकजण इच्छूक असतानादेखील बावनकुळे यांची वर्णी लागली होती. त्यामुळे फडणवीसांसी असलेली जवळीकता हा देखील महत्वाचा मुद्दा मानला जात आहे.

३. केंद्रीय पातळीवरुन नेतेही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबक विचारधीन आहेत. शिवाय आगामी काळातील निवडणुका आणि त्याअनुशंगाने पक्ष संघटनेचे कौशल्या या बाबींचा विचार केला जात आहे. ओबीसी समाजाचे मोठे नेते आणि पक्ष संघटनेसाठी होणारा फायदा या दोन्ही बाजू महत्वाच्या ठऱणार आहेत.

४. विदर्भात भाजप नेत्यांची काही कमी नाही. असे असताना देखील बावनकुळे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असाताना २०१४ ते २०१७ या काळात ते उर्जामंत्री देखील होते. त्या काळातील त्यांच्या कामामुळे सरकारी योजनांच्या अंमलबाजवणीला वेग आला होता. आता विधानपरिषेदवर ते आमदर असले तरी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जाबाबजारी आली आहे.

५. २०१४ ते २०१९ या काळात बावनकुळे हे मंत्रि राहिलेले असताना देखील २०१९ च्या निवडणुकीमध्ये त्यांची उमेगदवारी नाकारण्यात आली होती. असे असताना देखील त्यांनी पक्ष देईल जाबाबदारी घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. त्याचाच फायदा त्यांना याठिकाणी झाला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *