जुन्नर तालुक्यात रक्षाबंधन उत्साहात साजरा

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
११ ऑगस्ट २०२२

आळेफाटा


जुन्नर तालुक्यामध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा झाला.रक्षाबंधनाच्या दिवशी पाऊस नसल्याने बहीण आपल्या भाऊरायला राखी बांधण्यासाठी जाताना सकाळपासून रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसून येत होती. बाजारात ५ ते ५०० रुपयांपर्यंतच्या राख्या विक्रीसाठी आल्या होत्या. दुकानात सकाळपासून महिलांची गर्दी दिसत होती.तसेच सोशल मीडियावर दिवसभर शुभेच्छांचा पाऊस पडत होता.अनेकांनी आपल्या भावाला राखी बांधताना तसेच राखी बांधून घेताना अनेक भावांनी फोटो स्टेटस ठेवले होते. श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम.


आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.आज खऱ्या अर्थाने धाग्याचा मान राखणे महत्वाचे आहे.साधा एक धागा राखीही राखीच आहे.बाजारात खूप प्रकारच्या राख्या विकायला येतात.दिसायच्या राखीपेक्षा भावा बहिणीचे प्रेम महत्वाचे असते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *