उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ओतूर येथे आर्थिक साक्षरता मेळावा व कर्जवाटप मेळावा संपन्न

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०८ ऑगस्ट २०२२

ओतूर


ओतूर (ता.जुन्नर) येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती जुन्नर, ग्रामपंचायत ओतूर आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, ओतूर यांचे संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता मेळावा आणि बँक कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला.
या बँक मेळाव्यामध्ये ओतूर, रोहकडी, डुंबरवाडी, नेतवड (माळवाडी) येथील २० समूहांना एकूण २५ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. यावेळी ओतूरच्या सरपंच गीता पानसरे, तालुका अभियान व्यवस्थापक जुन्नर (MSRLM) उषा अभंग, प्रभाग समन्वयक रविंद्र आल्हाट, प्रभाग समन्वयक मधुकर ठोंगीरे ,बँक ऑफ महाराष्ट्र बँक मॅनेजर ओतूर नितेश झा, सुधीर फाले व सागर गणोरकर (बँक प्रतिनिधी) बँक सखी, सी.आर. पी. ताई उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांना उषा अभंग, गिता पानसरे आणि नितेश झा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *