दिव्यांग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा – विस्तार अधिकारी संचिता अभंग

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०५ ऑगस्ट २०२२

नारायणगाव


दिव्यांग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी अपेक्षा जुन्नर पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी संचिता अभंग त्यांनी व्यक्त केली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकास व्हावा, त्याबाबतचे वार्षिक नियोजन करून विद्यार्थ्यांना चालणा मिळावी यासाठी पालकांचे उद्बोधन पालक सभेच्या माध्यमातून होण्याकरिता पालक सभेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वारूळवाडी येथील समूह साधन केंद्रात करण्यात आले होते. त्यावेळी विस्ताराधिकारी पाहुणे म्हणून अभंग बोलत होत्या.

दिव्यांग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडून आला पाहिजे.आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ व्हायला हवा. दिव्यांग समावेशित उपक्रमाचा उपयोग दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी होणे गरजेचे आहे. यासाठी समाज व पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा. असे प्रतिपादन देखील जुन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग यांनी केली. यावेळी त्यांनी पालक सभेतील पालकांना विस्तृत मार्गदर्शन केले. पालक सभेचा मुख्य हेतू दिव्यांग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व वैयक्तिक विकास होणे व त्याबाबतचे नियोजन करून विद्यार्थ्यांना चालना देऊन पालकांना करणे याबाबतची संपूर्ण माहिती विशेष शिक्षक संगीता डोंगरे यांनी दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब मेहेर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपल्या पाल्याची वेगवेगळ्या टप्प्यांवर कशी प्रगती झाली हे उपस्थितांना सांगितले. जिल्हा परिषद जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे व पंचायत समिती जुन्नर च्या दिव्यांग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदरची पालक सभा गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाली. कार्यक्रम प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग, शालेय प्रतिभा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब मेहेर, दिव्यांग प्रवर्गातील ४० विद्यार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते. पालक प्रतिनिधी अनिता मुळे, रेखा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदेश तोडकरी यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *