रोटरी क्लब ऑफ आळेफाटा च्या वतीने गरजु होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

रामदास सांगळे
विभागीय संपादक
०४ ऑगस्ट २०२२

आणे


रोटरी क्लब ऑफ आळेफाटा (सेंट्रल) च्या वतीने गरजु होतकरू विद्यार्थिनींना जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते सायकल वाटप. रोटरी क्लब ऑफ आळेफाटा (सेंट्रल) यांच्या विद्यमानाने सन २०२२-२३ च्या नवनिर्वाचित संचालक मंडळ यांच्या पदग्रहण सोहळा दि.२ ऑगस्ट रोजी आळेफाटा येथे पार पडला. या सोहळ्यानिमित्त रोटरी क्लबच्या वतीने सरदार पटेल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणे (ता.जुन्नर) मध्ये नळवणे-नवलेवाडी- सुरकुलेवाडी येथून सुमारे ११ किमी अंतर पायपीट करणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे स्वागत आणे परिसरामधून होत आहे.


यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते विद्यालयातील १० मुलींना सायकली वाटप करण्यात आले. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिलजी परमार,अध्यक्ष ज्ञानेश जाधव, उपाध्यक्ष विजयकुमार आहेर, सेक्रेटरी संभाजी हडवळे सर,माजी अध्यक्ष सागर लामखडे, अँड.संजय टेंभे,सामाजिक कार्यकर्ते सुहास नांगरे,प्रशांत दाते, विद्यालयाच्या मुख्याध्यापक सविता झिंजाड, उपशिक्षक रविंद्र जाधव ,तुषार आहेर,पालक प्रतिनिधी, चंद्रशेखर आल्हाट, विठ्ठल गगे,बाळू पेढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *