रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी हा क्लब मानवसेवेला समर्पित – रो.डाॅ.अनिल परमार

भोसरी प्रतिनीधी
०२ ऑगस्ट २०२२

भोसरी


भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहामध्ये रोटरी क्लब भोसरीचा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना रो.डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॅा अनिल परमार म्हणाले ” रोटरी क्लब आॅफ डायनॅमिक भोसरी या क्लबने मागील वर्षात केलेल्या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून मानवसेवेचे महान कार्य करण्यात आले, दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप, नेत्र तपासणी,चष्मेवाटप ,रक्तदान शिबिरांचे आयोजन, व्हॅक्सिनेशन, अन्नदान तसेच मेट्रो स्टेशनवर टिव्ही व वाॅटर डिस्पेन्सर संच लोकार्पण अशा अनेक कार्यामुळे हा क्लब मानवसेवेला समर्पित क्लब आहे.

रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी पुणेचा पदग्रहण सोहळा दि.२८ जुलै रोजी कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे प्रांतपाल ३१३१ चे डॉ.अनिल परमार,असि.गव्हर्नर विलास काळोखे यांच्या सह रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर, भोसरी क्लबचा पेरंट क्लब राजगुरूनगर क्लबचे सर्व पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला.चार्टर प्रेसिडेंट डॉ.अशोककुमार पगारिया यांनी स्वागत व प्रास्तविक केले. तसेच पाॅवरपाइंट प्रेझेंटेशन वर मागील वर्षीच्या कार्यकाळात रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीने केलेल्या तेरा उपक्रमांची माहिती दिली. या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने नूतन अध्यक्ष रामदास जैद सेक्रेटरी दिपक सोनवणे व संचालक मंडळाचा शपथविधी पार पडला. या कार्यक्रमापूर्वी रोटरी क्लब,अलयन्स क्लब व शिवांजली साहित्यपीठ यांच्यावतीने काव्यधारा हे कवी संमेलन पार‌ पडले. या कवी संमेलनाचे ‌अध्यक्ष डाॅ.अशोककुमार पगारिया तर शिवांजली साहित्यपीठाचे इंजी.शिवाजी चाळक, आपला आवाजाचे मुख्य संपादक व रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष अतुल परदेशी,समीक्षक व मुक्तपत्रकार प्रदीप गांधलीकर, शिवनेरी पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास आवटे, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे व आपला परिवारचे सुदाम शिंदे,यशोदिप पब्लिकेशनच्या प्रा.रूपाली अवचरे,ज्ञानाई फाऊंडेशनचे सिताराम नरके यांच्या उपस्थितीत हे कवी संमेलन उत्साहात पार पडले. ३३ कवींनी सहभाग घेतला.यावेळी सहभागी कवींना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

राष्ट्रगीताने व दिपप्रज्वलनाने या अधिकार व पदग्रहण सोहळ्याला सुरूवात झाली. नूतन अध्यक्षांनी पुढील वर्षीचे संकल्पित कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमात स्वरभूषण चार्टर्ड अकाऊंटंट रो. भूषण तोष्णिवाल यांनी भावगीत सादर केले. सूत्रसंचालन सौ.अर्चना कदम, रो.पी.एम.जैन यांनी केले. आभार नूतन सचिव रो.दिपक सोनवणे यांनी मानले. रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे सदस्य व कार्यकारिणी, रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर सर्व पदाधिकारी, प्रितम प्रकाश‌ महाविद्यालय व आर.आर.इंडस्ट्रीजचा स्टाफ,अलायन्स ‌क्लब आॅफ पिंपरी चिंचवड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *