मा. उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२९ जुलै २०२२

भोसरी


महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे या दोन्ही लोकप्रिय नेत्यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त लीगल सेल चे प्रदेश अध्यक्ष ॲड. आशिष दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी परिसरातील स्नेहछाया बालकाश्रम येथे राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ॲड सोनाली ताई घाडगे यांच्या वतीने मुलांना शालेय साहित्य तसेच स्नेहभोजन देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेल पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा सोनाली घाडगे यांचा उपक्रम

सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, लहान मुलांनी अजित भाऊ गव्हाणे यांना ५१ दिव्यांनी औक्षण केले तसेच सर्व लहान बालकांनी शुभेच्छा दिल्या, अजित पवार आणि अजित गव्हाणे यांचा वाढदिवस शहर भर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्याच पार्श्वभूमीवर इतर अनावश्यक खर्च टाळून लीगल सेल अध्यक्षा ॲड. सोनाली घाडगे यांनी संकल्प केला की आपण इतर खर्च टाळून ज्या मुलांना आई वडील नाही अश्या अनाथ मुलांसोबत अजित गव्हाणे यांच्या उपस्थित अजित पवार आणि अजित गव्हाणे यांचा वाढदिवस साजरा करायचा आणि शालेय साहित्य वाटप करायचे ठरवले आणि हा अतिशय हा कार्यक्रम साजरा केला.

लहान मुलांनी ५१ दिव्यांनी औक्षण करून केला वाढदिवस साजरा

अजित भाऊ आपले काम खुप छान आहे तसे संजोग वाघेरे यांचे ही काम चांगले होते आपली शहर अध्यक्ष पदी निवड झाल्या पासुन शहरात खुप आनंदाचे वातावरण आहे जुलै महिना म्हणजे वाढदिवसाचा महिना या महिन्यामध्ये अनेक आपल्या पक्षाच्या पदाधिकारी तसेच नेत्याचे वाढदिवस असतात त्यामध्ये अजित दादा पवार आणि आपलाही वाढदिवस असतो. आम्ही आज आपल्याला वाढदिवसाच्या निमित्ताने अजित दादा पवार हे मुख्यमंत्री होवो आणि आपण लवकरच आमदार होवो अशा शुभेच्छा देतो. अश्या शब्दात सोनाली ताईंनी व सुप्रियाताई सोलंकुरे, यांनी अजित गव्हाणे यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भावी आमदार असलेला केक सुद्धा कापला. तसेच मुलांना शालेय साहित्य वाटप अजित गव्हाणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावेळी महिला शहराध्यक्ष कविताताई आल्हाट लीगल सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुहास पडवळ, ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, वाहतूक सेलचे अध्यक्ष काशिनाथ जगताप, चऱ्होली गावचे पोलीस पाटील तात्यासाहेब तापकीर, महिला मुख्य समन्वयक सुप्रिया सोलंकुरे, शिक्षक सेलचे अध्यक्ष संदीप तापकीर, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष अनिल तापकीर, लीगल सेल पिंपरी चिंचवड शहराचे सचिव ॲड अधिक चऱ्हेगावकर, ॲड. भैय्यासाहेब वाघमारे अमोल देवकर मंगेश असवले, कामगार सेलचे कार्याध्यक्ष युवराज भाऊ पवार, सामाजिक कार्यकर्ते किरवेताई इत्यादी उपस्थित होते.

तसेच सामाजिक बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली त्याबद्दल लीगल सेल अध्यक्षा ॲड. सोनाली घाडगे यांनी लहान मुलांना अजित गव्हाणे यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच स्नेह छाया बालकाश्रमाचे प्रा दत्तात्रय इंगळे, व सौ सारिका इंगळे, यांचे व सर्व मान्यवरांचे ॲड. सोनाली घाडगे यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *