माजी उपमहापौर कामगार नेते केशव घोळवे यांच्या प्रयत्नाला यश

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२८ जुलै २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागातील मानधनावरील बावीस कर्मचार्‍यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सामावून घेण्यात आले आहे. राज्याचे कामगार नेते माजी उपमहापौर यांनी यासंदर्भात प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नांना घवघवीत यश प्राप्त झाले आहे.

तब्बल १६ वर्षानंतर मानधनावरील २२ कर्मचारी महापालिका सेवेत

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात प्रजनन व बालआरोग्य योजनेअंतर्गत बावीस कर्मचारी मानधनावर घेण्यात आले होते. या कर्मचार्‍यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत दाखल करुन घ्यावे या मागणीसाठी राज्याचे कामगार नेते व माजी उपमहापौर केशव घोळवे हे सातत्याने प्रयत्न करत होते. या संदर्भात घोळवे यांनी राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाचे दरवाजे देखिल ठोठावले व राज्य शासनाने या मानधनावरील कर्मचार्‍यांना महापालिका सेवेत दाखल करुन घेण्याचे आदेश दिले होते.

शासन निर्णय क्र. पीसीसी-2020/प्रक्र 379/नवि- दिनांक 2/11/2021 अन्वये या बावीस कर्मचार्‍यांना महापालिका सेवेत दाखल करुन घेत असल्याचे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त बाळासाहेब खांडेकर यांना दिले आहेत. हे आदेश प्राप्त होताच या कर्मचार्‍यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त बाळासाहेब खांडेकर, वैद्यकीय अधिकार पवन साळवे, वर्षा डांगे यांना पेढे देवून आनंद व्यक्त केला.

एकमेकांना पेढे भरवून केला आनंद सजरा

 

 

या संदर्भात आपला आवाजकडे फोन वर बोलताना केशव घोळवे म्हणाले की, या कर्मचार्‍यांना सोळा वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेत घेतले आहे. या कर्मचार्‍यांनी कोरोना काळात देखिल पिंपरी चिंचवड महापालिका सेवेत उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली. या कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देणे आवश्यक होते. यासंदर्भात राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाचे देखिल खूप मोठे सहकार्य झाल्याचे केशव घोळवे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेत दाखल करुन घेण्यशात आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये मंदा लोखंडे, शामल देशपांडे, स्मिता पोटे, वैशाली शास्त्रकार, रेश्मा सोनावले, वर्षा दिक्षीत, मोनाली लोहार, सुकेशीनी सावगळे, वैशाली पासगे, सुरेखा चव्हाण, मनिषा येवले, दिपाली सोनवणे, माया गीरी, नुरबाश रिजवाना, अंकुश मुंढे, स्नेहल कदम, विक्रम काटकर, वंदना चव्हाण, प्रविण घोटकर, अंकीता बंदपट्टे, अंकुश गायकवाड, मेघा ऊगले आदींचा समावेश आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *