आण्यात प्लास्टिक मुक्त गाव अभियान: विद्यार्थी,नागरिकांचा उदंड प्रतिसाद

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२८ जुलै २०२२

आणे


महाराष्ट्राचे नेते माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार व जुन्नर शिवजन्मभूमीचे युवा आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त, सरदार पटेल हायस्कुल अणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पठार विभाग अणे (ता.जुन्नर) तथा स्व.सचिनशेठ दाते युवा विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री क्षेत्र अणे याठिकाणी प्लास्टिक मुक्त गाव अभियान राबविण्यात आला.

तद्नंतर विद्यार्थ्यांना स्व.सचिनशेठ दाते युवा विचार मंचातर्फ़े खाऊ वाटप देखील करण्यात येऊन हा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पठार विभाग प्रमुख प्रशांत दाते, ऍड.संतोष आहेर, जुन्नर तालुक्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ, तथा सरदार पटेल हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत अतिशय आनंदाने व उत्साहाने अभियान राबविण्यात आले. प्लास्टिकचा वापर मानवास हानिकारक असून त्याचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात.त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी गावात इतरत्र पडले प्लॅस्टिक गोळा केले.व प्लास्टिक च्या पिशव्या न वापरण्याचा निश्चिय केला.या उपक्रमामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांच कौतुक होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *