पवन गाडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी च्या सहकार्याने वृक्षारोपण…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ जुलै २०२२

जुन्नर


आपला आवाज न्यूज नेटवर्क चे निवासी संपादक रोटेरीयन पवन गाडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी च्या सहकार्याने वनविभाग जुन्नर येथील धामणखेल हद्दीतील जागेत वड व पिंपळ या वृक्षांचे रोपण करण्यात आले. पवन गाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आजवर रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी च्या सहकार्याने जवळपास एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

रविवार दि.१७ जुलै रोजी आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी पी.व्ही.सपकाळ सर मुख्य न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय जुन्नर, रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे अध्यक्ष अतुलसिंह परदेशी, तुषार लाहोरकर,पवन गाडेकर, माजी सैनिक रमेश खरमाळे, हितेंद्र गांधी, सुनिल जाधव, सचिन खत्री, विकी पंजवाणी, सुप्रित रेणूकदास, जुन्नर बार असोसिएशन चे अध्यक्ष केतन पडवळ धामणखेल गावचे सरपंच संतोष जाधव, उपसरपंच देवराम कोंडे, मार्तंड खंडोबा देवस्थान ट्रस्ट धामणखेल चे अध्यक्ष गबाजी कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

खंडोबा देवस्थान धामणखेल येथे दर्शन घेऊन वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी धामणखेल चे सरपंच संतोष जाधव यांच्या हस्ते जुन्नर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी.व्ही. सपकाळ ,रोटरी क्लब ऑफ जुन्नर चे अध्यक्ष अतुलसिंह परदेशी, पवन गाडेकर व रोटरी सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *