‘आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या’ : अंगणवाडी सेविकांची मागणी

रामदास सांगळे
विभागीय संपादक
११ जुलै २०२२

आळेफाटा


आळेफाटा (ता. जुन्नर) येथे श्री संत सावतामहाराज मंदिर सभागृहात शनिवार (दि.९) रोजी झालेल्या नारायणगाव प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मेळाव्यात, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, मानधन वाढ करण्यात यावी, इंधन दरवाढ पन्नास पैशांवरून तीन रुपये करण्यात यावी, रिक्त जागा तातडीने भराव्यात आदी विविध मागण्या करण्यात आल्या. नारायणगाव प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संघटनात्मक मेळावा आळेफाटा येथे पार पडला.

यावेळी जुन्नर तालुका कार्याध्यक्षपदी संगीता रायकर यांची, तर तालुका उपाध्यक्षपदी सुजाता गोसावी यांची निवड करण्यात आली. तर नारायणगाव प्रकल्प सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून रुपाली शिंदे यांची निवड करण्यात आली. तसेच नारायणगाव प्रकल्पातील बीट प्रमुख म्हणून सुषमा वाणी, शैला वारूळे, शोभा आतकरी, जया भोर, सुनंदा कोंडे, रेखा दाते, सविता डोंगरे, अनिता घोडे, हसीना पटेल यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष निलेश दातखिळे, जिल्हाध्यक्ष सविंद्रा बोऱ्हाडे, जुन्नर तालुका अध्यक्ष अनिता गुंजाळ, माजी अध्यक्ष शोभा डुंबरे आदी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या तालुका कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष व नारायणगाव प्रकल्पातील बीटनिहाय प्रमुख प्रतिनिधींची निवड करण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *