जुन्नर, येथे रविवारी पार पडणार राज्यस्तरीय हिरडा परिषद

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०६ जुलै २०२२

आंबेगाव


पुणे जिल्ह्यातील आंबेगाव,जुन्नर व खेड तालुक्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या, बाळहिरडा या गौणवनउपजाची,खरेदी वर्षानुवर्षे आदिवासी विकास महामंडळ करत असे. परंतु मागील चार वर्षांपासून आदिवासी विकास महामंडळ यांनी,बाळहिरडा खरेदी करणे थांबवले आहे. आदिवासी भागातील, नागरिकांचे मुख्य उत्पनाचे साधन असलेले व नगद रक्कम प्राप्त करून देणारे बाळहिरडा हेच एकमेव साधन या भागातील नागरिकांचे आहे.

बाळहिरड्याचे भाव सद्यस्थितीत,अत्यंत कमी झाले असून,यातून प्रचंड मोठे आदिवासी व बिगर आदिवासी, यांचे शोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर,किसानसभेने व्यापक जनआंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करणेसाठी व आदिवासी आणि बिगर आदिवासी यांची उपजीविका सुनिश्चितीसाठी,राज्यस्तरीय हिरडा परिषद,रविवार दि.१०-७-२०२२ रोजी,जुन्नर शहरात आदिवासी सांस्कृतिक,भवन येथे संपन्न होत आहे.

किसान सभा महाराष्ट्र राज्य समितीचा पुढाकार

किसान सभेच्या राज्य समितीने या परिषदेचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या परिषदेला,पुणे, अहमदनगर तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील हिरडा उत्पादक शेतकरी व किसान सभेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत हिरड्या विषयी मुख्य तीन ठराव मांडले जाणार आहे.याबरोबरच इतर सामाजिक प्रश्नांवर ही ठराव या परिषदेत मांडले जाणार आहे. यामध्ये मुख्यतः हिरड्या विषयी,

1.राज्यशासनाने, आदिवासी विकास महामंडळाला,बाळहिरडा खरेदी करण्यासाठी आवश्यक तो निधी तत्काळ उपलब्ध करून देवून,तातडीने बाळहिरडा खरेदी करावा.व त्यास रास्त दर द्यावा.

2.आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या हितार्थ दीर्घकालीन धोरण ठरवण्यासाठी, बाळहिरडा व मोठा हिरडा यांचा अभ्यास करणारी समिती स्थापित करावी.

3.निसर्ग चक्रीवादळात बाळहिरड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,त्यावेळी शासनाने पंचनामे केले होते, परंतु ही नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही,ही नुकसान भरपाई त्वरित मिळावी.

हे तीन ठराव असणार आहेत. या हिरडा परिषदेचे उद्घाटक ,माकपचे, डहाणूचे आमदार विनोद निकोले करणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जुन्नर, विधानसभा सदस्य, आमदार अतुल बेनके,अखिल भारतीय किसान सभा,महाराष्ट्र राज्य समितीचे सरचिटणीस डॉ.अजित नवले,जेष्ठ कम्युनिस्ट नेते,अजित अभ्यंकर, प्रकल्प अधिकारी, घोडेगाव मा.बळवंत गायकवाड आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी, मा.राहुल पाटील,किसान सभेचे राज्य पदाधिकारी, कॉ.उमेश देशमुख इ.उपस्थित राहणार आहेत. तर या परिषदेचे अध्यक्ष किसान सभेचे, जिल्हा अध्यक्ष,एड.नाथा शिंगाडे असणार आहे. या परिषदेचे,स्थानिक समन्वय, किसान सभा,पुणे जिल्हा समिती करत आहे. या परिषदेला अधिकाधिक संख्येने सजग नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन किसान सभेच्या वतीने आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *