जिल्हा परिषद गटनेते शरद लेंडे यांना मातृशोक

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२३ जून २०२२


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य, पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते शरद किसनराव लेंडे यांच्या मातोश्री तुळसाबाई किसनराव लेंडे वय ८७ यांचे आज गुरुवार दि २३ जून रोजी दुपारी ३.२५ वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.

त्यांचे पती किसनराव लेंडे हे पिंपळवंडी गावचे उपसरपंच तसेच सोसायटीचे चेअरमन होते. त्यांनीही जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. त्यांच्या मागे सगळा पाच भावांचा प्रपंच त्या सांभाळत होत्या. त्या घरातील मोठ्या सुनबाई होत्या मनमिळाऊ आणि सर्वाना बरोबर घेऊन जाणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ वेक्त होत आहे.

त्यांचा अंत्यविधी उद्या शुक्रवार दि २४ जून रोजी वैकुंठधाम पिंपळवंडी येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. त्यांच्या दुःखात तालुक्यातील राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि नागरिकांनी शोक वेक्त केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *