नारायणगाव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२२ जून २०२२

नारायणगाव


ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथे राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. तसेच योगाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. आयुष मंत्रालय कडून निर्देशित योगाचे विविध आसनांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले त्या मध्ये ताडासन, वज्रासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, अर्ध उष्ट्रासन, उष्ट्रासन, अर्धहलासन शशांकसन, उत्तान मण्डूकासन, वक्रासन,मकरासन, शलशासन, भुजंगासन,सेतूबंधसर्वांगासन, उत्तान पादासन, इत्यादी घेण्यात आले.

काल ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस, आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील व्यक्तीला दीर्घ करते. २१ जून २०१५ रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला, ज्याची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या भाषणात केली होती. त्यानंतर २१ जून हा “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे यांनी दिली.

यावेळी उपप्राचार्य होले जी.बी. ,डॉ. कुलकर्णी सर, डॉ. टाकळकर सर, शेख सर, आणि रा.से.यो.प्रा. डॉ.श्रीकांत फुलसुंदर व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन मानसशास्त्र विभाग प्रमुख व एनसीसी विभाग प्रमुख डॉक्टर कॅप्टन दिलीप शिवणे, , विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. लहू गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभागात प्रमूख प्रा. स्वप्निल कांबळे, आणि क्रीडा संचालक प्रा.ओंकार मेहेर यांनी केले.तसेच वाणिज्य विभागातील पूर्वा साने, मधुरा काळभोर, अश्विनी गायकवाड यांनी योगाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शपथ डॉक्टर कॅप्टन दिलीप शिवणे यांनी दिली. यावेळी एकूण एन सी सी चे १०० छात्र आणि १०० एन.एस.एस.चे स्वयंसेवक उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *