मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम : शिरूर न पा च्या ५४ सफाई कामगारांचा आरोग्य विमा काढला मनसे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१५ जून २०२२

शिरूर


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने, शिरुर नगरपरिषदेतील स्वच्छता विभागातील ५४ कर्मचाऱ्यांसाठी, एका वर्षासाठी असणारा आरोग्य विमा, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांच्या वतीने मोफत काढण्यात आलेला आहे. सय्यद यांनी यावेळी ‘आपला आवाज’ शी बोलताना सांगीतले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकृती च्या कारणामुळे, त्यांना प्रत्यक्ष न भेटण्याचे आवाहन त्यांनी केलेले होते. त्यामुळे त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही सर्व मनसैनिकांनी ठरविले की, त्यांचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा. त्याच पार्श्वभूमीवर राज्यभर आम्ही मनसैनिक विविध सामाजिक उपक्रम घेत राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. त्यामुळेच आम्हीही शिरूर येथील नगर परिषदेत स्वच्छतेचे काम करणाऱ्या व ठेकेदार पद्धतीच्या कामगारांचा एक वर्षाचा आरोग्य विमा उतरवित आहोत. कारण गेली वर्षभरात अशा दोन कामगारांचा मृत्यू झालेला होता. मृत्युपच्छात त्यांच्या कुटुंबियांचे खूप आर्थिक हाल झाले, हे शिरूरकरांनी पाहीलेय. कारण त्यांचा कुठल्याही प्रकारचा विमा नव्हता. त्यामुळेच आम्ही अशा गरजू स्वच्छता दूतांचा आरोग्यविमा उतरविण्याचे ठरविले. हा आरोग्यविमा बजाज अलायन्स कंपनीचा असून, याचे नाव संकटमोचन असे आहे. याचा कालावधी एक वर्ष असून, या कालावधीत कर्मचाऱ्यास कर्तव्यावर असताना दुखापत झाली, अपघात झाली तर नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम मिळू शकेल.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

हा उपक्रम आम्ही सामाजिक बंधीलकीतुन करत असून, स्वच्छ व सुंदर शिरूर ठेवण्यात व त्यासाठी आपल्या प्राणांचीही बाजी लावणाऱ्या व सतत ऑन ड्युटी असणाऱ्या या गरीब स्वच्छता दूतांसाठी थोडाफार हातभार लागावा यासाठी काढत असल्याचे महिबूब सय्यद यांनी सांगितले.

शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी, अशा गरजू स्वच्छता कर्मचाऱ्यांना विमा पॉलीसी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी शिरुर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेच्या जेष्ठ कार्यकर्त्या तारुआक्का पठारे, रविराज लेंडे, सुनील खेडकर, सुदाम चव्हाण, डॉ. वैशाली साखरे, शारदा भुजबळ, नाना लांडे, विमा प्रतिनिधी चंदू बोरा, नगरपालिका स्वच्छता विभागाच्या अभियंता राजश्री मोरे, मनोज अहिरे उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *