दिव्यांगांच्या शिक्षणासाठी जुन्नर तालुक्यातील अंगणवाडी सेविका सज्ज

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
११ जून २०२२

आळेफाटा


पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग समावेशित शिक्षण च्या वतीने आयोजित “दिव्यांग मूल आणि त्यांचे शिक्षण” या कार्यशाळेमधे तालुक्यातील चाळकवाडी, नगदवाडी, काळवाडी या तीन केंद्रांमधून जवळपास साठ अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला. यावेळी दिव्यांगत्वाचे प्रकार, दिव्यांग मुले का जन्माला येतात ? दिव्यांग मूल जन्माला येऊच नये म्हणून काय काळजी घ्यावी ? दिव्यांग मुलांचा सांभाळ कसा करावा दिव्यांग मुलांना कसे शिकवावे ? त्यांना कसे अध्यापन करावे ? दिव्यांग मुलांचे early intervention (शीघ्र हस्तक्षेप) कसे करावे ? याबाबत विशेष तज्ञ शिक्षिका संगीता डोंगरे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.


पंचायत समिती जुन्नरच्या समावेशित शिक्षण तज्ञ संगीता भुजबळ यांनी दिव्यांगांच्या शिक्षणात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर पिंपळवंडी बीट १ च्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका आशा कान्होरे यांनी प्रत्येक दिव्यांग मूल शिकले पाहिजे आणि स्वावलंबी झाले पाहिजे असे प्रतिपादन केले. या कार्यशाळेसाठी पंचायत समिती जुन्नर च्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे आणि गट समन्वयक संचिता अभंग तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पिंपळवंडी बीट २ च्या पर्यवेक्षिका ऐश्वर्या जगताप उपस्थित होत्या.


या कार्यशाळेचे प्रास्ताविक समावेशीत शिक्षण तज्ञ संगीता भुजबळ यांनी केले या कार्यशाळेचे सूत्रसंचालन विशेष तज्ञ शिक्षक विलास पिंगट यांनी केले तर आभार प्रदर्शन पंचायत समिती जुन्नर चे समावेशित शिक्षणतज्ञ सुदेश तोरकडी यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *