पिंपळगाव जोगा कालव्याच्या संपादित जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना लवकरच मिळणार

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०९ जून २०२२

आळेफाटा


आळे (ता.जुन्नर) येथील पिंपळगाव जोगा कालव्याच्या संपादित जमिनीचा मोबदला शेकऱ्यांना तात्काळ मिळावा यासाठी मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची आमदार अतुल बेनके यांनी भेट घेऊन मागणी केली. आळे गावातील पिंपळगाव जोगा कालव्याच्या संपादित जमीनीची मोबदला संबंधित बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा, अपूर्ण पोट चाऱ्यांची कामे पुर्ण व्हावे. यापूर्वी सादर केलेल्या निवेदनाचा संदर्भ देवून लवकरात लवकर बैठक बोलवून विषय मार्गी लावण्याबाबत विनंती केली.

जलसंपदा मंत्र्यांनी याविषयावर पुण्यात बैठक आयोजित करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. व पुढील काही दिवसांतच यावर बैठक होवून विषय मार्गी लागेल असे आश्वासन पाटील यांनी दिले. बाधित शेतकऱ्यांना व पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना अपुऱ्या चाऱ्यांची कामे मार्गी लागतील असा विश्वास देतो आमदार बेनके यांनी दिला. या वेळी आळे गावचे उपसरपंच विजय कुऱ्हाडे उपस्थित होते.गावचे सरपंच प्रितम काळे व उपसरपंच यांचा सततचा पाठपुरावा सुरू असतो.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *