शिवसेनेचा मनसेला मोठा धक्का! राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेला पुण्यात पाडणार खिंडार!

प्रसन्न तरडे
बातमी प्रतिनिधी
२१ मे २०२२


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा वादग्रस्त ठरली होती. या सभेनंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. आत्ता त्यांचा अयोध्या दौराहि तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. त्यात त्यांच्यावर चारी बाजूनें होणारी टीका ह्यावर राज ठाकरे काय उत्तर देणार ह्याकडे सर्वांचे लक्ष आहे त्यामुळे आता पुण्यातील सभाही वादळी ठरण्याची शक्यता आहे. या सभेची मनसेकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे, पुण्यात ठिकठिकाणी बँनरबाजी करण्यात आली असतानाच शिवसेनेनंही मनसेला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. या सभेदिवशीच मनसेचे २० पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हे निश्चित झाले आहे.

राज ठाकरे यांच्या पाडवा मेळावा नंतर मनसेला लागलेली गळती अज्जुनही थांबत नसल्याचे चित्र असताना आता पुण्यात शिवसेनेकडून पक्षाला खिंडार पडण्याची चिन्हे आहेत. राज ठाकरेंची उद्या २२ मे रोजी सकाळी १० वाजता पुण्यात सभा आहे. उद्याच मनसेचे २० पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री,शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शहर कार्यालयात उद्या हा कार्यक्रम होईल. यातून राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेला मोठा धक्का देण्याची खेळी शिवसेनेनी खेळल्याचं समोर येतं आहे. याआधीही पुण्यातील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला पडलेला खिंडार पक्षाला आव्हान देणारा आहे. ह्या सर्व घडामोडीवर राज ठाकरे काय भूमिका घेतात ह्याकडे सर्वांचे लक्ष असेल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *