राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा अखेर रद्द

रोहित खर्गे
विभागीय संपादक
 २० मे २०२२

पिंपरी


संपूर्ण देशाचे लक्ष लागलेला आणि रोज सोशल मीडिया आणि विबिध वृत्तवाहिणीवर चर्चेचा विषय म्हणजे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा. उत्तर प्रदेश चे खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना मारझोड केल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मगितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेऊन देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती. पण स्वतः राज ठाकरे यांनी तब्बेत बरी नसल्याने अयोध्या दौरा रद्द करणार असल्याचे ट्विट करून सांगितले. आणि अखेर बहुचर्चित राज ठाकरे यांचा उत्तर प्रदेश दौरा रद्द झाला आहे.

उत्तर प्रदेश चे भाजपचे बाहुबली खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी काहीही झाले तरी राज ठाकरे अयोध्येत पाय ठेऊ शकणार नाहीत या मताशी ठाम होते आणि त्यांनी तशी उत्तर प्रदेश मध्ये राळ उठवली होती. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश जनतेची माफी मागावी आम्ही त्यांचे स्वागत करू अशी भूमिका घेतली होती. ते अतिशय आक्रमक पवित्र्यात होते. ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पक्षाने आणि जनतेने मला भरभरून दिले आहे मला ना तर मुख्यमंत्री व्हायचे आहे ना ही मंत्री माझी एकच भूमिका आहे राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागावी तरच उत्तर प्रदेश च्या भूमीत त्यांना पाय ठेऊ देऊ.

ब्रिजभूषण यांच्या भूमिकेविरोधात राज ठाकरे यांनी भाष्य टाळले. आज तब्बेत बरी नसल्याने अयोध्या दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यात आता उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. उद्या रविवार सकाळी १० वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा मंडळ येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे . या सभेकडे आता देशाचे लक्ष लागले आहे. या सभेत राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील. ते ब्रिजभूषण यांच्याविरोधात काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *