पाण्याच्या शोधात हरणाचा मृत्यू: आणे पठार भागावर प्राण्यांसाठी पाणवठे करण्याची मागणी

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१४ मे २०२२

आणे


आणे (ता.जुन्नर) येथील संतोष गगे यांच्या शेतातील विहीरीत चिंकारा जातीचे पूर्ण वाढ झालेले नर हरीण मृत अवस्थेत आढळून आले.पाण्याच्या शोधात,अथवा शिकारी प्राणी मागे लागल्यामुळे ही घटना घडली असावी.असा अंदाज प्राणी मित्रांकडून वर्तवला जात आहे. सकाळी विहिरी जवळून जाणाऱ्या नागरिकांनी ही बाब पाहिल्याने स्थानिक नागरिकांनी वनविभागास कळविण्यात आले. स्थानिक वन कर्मचारी जयराम भंडलकर व स्थानिक नागरिकांच्या सहकारी यांनी मृत चिंकारा हरीण हरणाचा मृतदेह विहिरीतुन बाहेर काढला व पंचनामा करून शव विश्चेदन व पुढील कार्यवाही केली.

सध्या कडाक्याच्या उन्हामुळे वन्य प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात मनुष्य वस्तीजवळ येण्याच्या घटना आणे, नळवणे परिसरात नेहमी घडत असतात.या भागात शेकडो हरणांचा वावर आहे. वन विभाग यांनी वनक्षेत्रात विविध कृत्रिम पाणवठे तयार करावेत तसेच या परिसरातील विहिरीवर सरक्षक जाळी बसविणे आवश्यक आहे. या परिसरात हरिनासोबताच बिबटे, लांडगे आढळून येतात. या सर्वच वन्य प्राणी करिता विशेष संरक्षण व संवर्धन विषयक प्रयत्न स्थानिक पातळीवर सर्व शासकीय विभागाच्या वतीने लोक सहभाग मधून घेतल्यास येथील पर्यटनास देखील चालना मिळेल. स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *