पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला अटक

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१२ मे २०२२

आळेफाटा


आळेफाटा (ता.जुन्नर) येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या टोळीला आळेफाटा पोलीसांणी जेरबंद केल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांणी दरोडयासारखे गुन्हे होवु नयेत याकरिता गस्ती घालुन चेक करण्याचे आदेश संपुर्ण जिल्ह्य़ातील पोलीसांना दिलेले असताणा पहाटेच्या ३ वाजण्याच्या सुमारास आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रघुनाथ शिंदे, सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे, पदमसिंह शिंदे हे रात्रगस्त करत असताणा त्यांना कल्याण अहमदनगर मार्गावरील आळे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत बोरी फाटा या ठिकाणी आळेफाटा बाजुने आलेल्या ओमीणी कार “एम.एच. १४ ए.जी. ७२०३” हि संशयीत रीत्या भरघाव वेगाने जाताना आढळून आली. त्यांणी हि कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता ही गाडी जोरात पुढे निघुन गेली पोलीसांणी या वाहनाच वेगाने पाठलाग करून पकडले.

या वाहणात असलेले सात अनोळखी इसम अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेले परंतु पोलीसांणी त्यांचा पुन्हा पाठलाग केला असता रोडच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या:
१) नवनाथ राजु पवार (वय २१) रा. ढोकी ता. पारनेर जिल्हा अहमदनगर;
२) अनिकेत बबन पवार (वय२०) बोरी साळवाडी ता.जुन्नर;
३) अंकुश खंडू पवार रा. तांबवाडी वडगाव सावताळ ता.पारनेर जिल्हा अहमदनगर;
४) प्रविण दत्तात्रय आंबेकर (वय२५) वडगाव सावताळ ता. पारनेर जिल्हा अहमदनगर.

चांदी, रोख रक्कम, टिव्ही, तसेच इलेक्ट्रिक मोटार व त्यातील काॅपर असा ३ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल माल जप्त

या चार जणांना पकडले असता त्यांची चौकशी केली असता त्यांणी आळेफाटा या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलो होतो असे कबुल आहे. तसेच त्यांच्याजवळ असलेले लोखंडी हातोडा,चाकू, कोयता,स्कु ड्रायवर, कटर,नायलॉन रस्सी,चिगटपट्टी, टाॅच, मिरची पावडर मोबाईल हे साहीत्य मिळाले असुन जप्त केला आहे व:
१) कैलाश शिंदे धोत्रे ता. पारनेर;
२) विशाल खंडू पवार रा. तांबवाडी वडगाव सावताळ;
३) विकास बर्डे लाखणगाव ता.आंबेगाव
हे फरार झालेले आहेत.

दरम्यान यामधील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून दरोडा,जबरी चोरी तसेच मोक्का सारखे गुन्हे दाखल आहेत यातील अंकुश खंडू पवार हा कल्याण तालुका पोलीस स्टेशन ठाणे ग्रामीण येथील गु.र.न.१२९/२१ भा.द.वि. कलम ३९५ तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम मोक्का कलम ३(१), ३(२), ३(४) या गुन्ह्यांमध्ये १ वर्षांपासून फरार आहे.

अटक केलेल्या आरोपींची यापुर्वी आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमधील बोरी. बेल्हे, राजुरी, पिंपळवंडी, नळवणे, या परीसरात केलेल्या ५ गुन्हे कबुल केले आहेत तर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ३ गुन्ह्यांची कबुली दिली असुन त्यांचाकडुन या ठिकाणी चोरी केलेले चांदी, रोख रक्कम, टिव्ही, तसेच इलेक्ट्रिक मोटार व त्यातील काॅपर असा ३ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल माल जप्त केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *