तेलंग इन्स्टिट्यूटमध्ये हॉटेल व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन

भानुदास हिवराळे
बातमी प्रतिनिधी 
०२ मे २०२२

पिंपरी


चिंचवड येथील कॅ.ए.सो चे डॉ. अरविंद ब तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे “बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेंट एक सर्वोत्तम करिअर” आणि “जर्मनी मध्ये बेकरी विभागात करिअर करण्याची संधी” याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी प्रख्यात बेकरी शेफ. मायकल स्च्मिद्त यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

सदर कार्यक्रमास वेकफिल्ड प्रोडक्ट कोरर्पोरेशन पुणे चे कार्याध्यक्ष मुकेश मल्होत्रा, कॅम्प एज्युकेशन सोसायटी चे कार्याध्यक्ष वालचंद संचेती आणि सीईएस डॉ.अ.ब तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ. अजयकुमार एम. राय हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. सौरभ जाधव यांनी परिचय तर प्राचार्य डॉ.अजयकुमार राय यांनी स्वागत केले. शेफ. मायकल स्च्मिद्त म्हणाले कि, जर हॉटेल मॅनेजमेंट ची पदवी, एक वर्षाचा बेकरी कामाचा अनुभव असेल आणि जर्मन भाषेचे मुलभूत ज्ञान असेल तर विद्यार्थी जर्मनी मध्ये बेकरी विभागात खूप चांगले करिअर करू शकतो. कारण तिथे बेकरी व बुत्चेरी शेफ ची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. असे सांगितले.

मुकेश मल्होत्रा म्हणाले कि जर्मनी मध्ये करिअर करण्यासाठी बेकरी बाबत जसे पायाभूत सुविधा, अद्ययावत साधनसामुग्री, प्रशिक्षित जर्मन शिक्षक अशा ज्या काही मुलभूत गोष्टींची गरज आपल्या विद्यार्थ्यांना लागेल त्यासाठी आम्ही मदत करू असे सांगितले. प्राचार्य डॉ. अजयकुमार राय यांनी सांगितले कि योग्य मार्गदर्शन जर दिले तर आपले अनेक विद्यार्थी जर्मनीमध्ये प्रतिष्ठित बेकरी शेफ म्हणून जातील. प्रा. दीपक मोरे यांनी आभार व्यक्त केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *