आमोंडी ता.आंबेगाव हद्दीत वन्यजीवांसाठी वनविभागाने तयार केलेला पाणवठा.

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१९ एप्रिल २०२२

आमोंडी


उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा वाढतच आहे त्यामुळे वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणवठे कोरडे पडले आहे. यामुळे वन्यप्राण्यांचे पाण्याअभावी हाल होतात आणि मग पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागू नये यासाठी वनविभागाकडून वनपरिमंडळ कानसे अंतर्गत येणाऱ्या फुलवडे, कानसे, आमोंडी, गंगापूर या गावांमध्ये जंगलात पानवठे तयार करण्यात आले असून या पानवठ्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे यांनी दिली. नपरिमंडल कानसे येथील वनपाल पी. पी. लांघी, वनरक्षक एन. टी. दळवी, एफ. के. काळे, सी.के केदारी, शीला सुपे यांनी पाणवठ्यासाठी परिश्रम घेतले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *