पिंपळगाव जोगे कालव्यात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१८ एप्रिल २०२२ 

राजुरी


पिंपळगाव जोगे धरणाच्या डाव्या कालव्यावरील चारी क्रमांक २४ वर राजुरी (ता.जुन्नर) गावच्या हद्दीमध्ये अंदाजे ७० वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव जोगे धरणाचा कालव्याच्या राजुरी या ठिकाणी चारी क्रमांक २४ या ठिकाणी शनिवार दि.१६ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांणा कालव्यांमधून एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात वहात येताना दिसुन आला.त्यानंतर ग्रामस्थांणी याबाबतची माहीती आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये दिली.घटनास्थळी पोलीसांणी भेट दिल्यावर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर त्याची ओळख ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सर्वत्र फोटो पाठवले असून पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली एन.टी.गायकवाड हे करत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *