मलठण वि का से स सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष रामचंद्र दंडवते व व्हाईस चेअरमन पदी मथुरा विलास जगताप यांची बिनविरोध निवड

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१६ एप्रिल २०२२ 

शिरूर


शिरूर तालुक्यातील एक महत्वाचे व मोठे समजले जाणारे गाव म्हणजे मलठण. सध्या शिरूर तालुक्यातील मलठण हे गाव आंबेगाव विधान सभा मतदार संघात समाविष्ट असुन, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे या मतदार संघाचे नेतृत्व करत असल्याने, ग्राहमंत्र्यांच्या मतदार संघातील या मोठ्या गावाला राजकीयदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे.

नुकतीच येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक झालीय. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली असुन, चेअरमन पदी सुभाष रामचंद्र दंडवते व व्हाईस चेअरमन पदी मथुरा विलास जगताप यांची बिनविरोध निवड झालीय. बिनविरोध निवडणुकीमुळे मलठण गावाने परिसरातील गावांमध्ये एक आदर्श ठेवलाय.

मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन ही दोन्ही पदे बिनविरोध होण्यासाठी, मलठण ग्रामस्थांनी पुढाकार घेतलेला होता. या सोसायटीच्या संचालक पदी शरद मोहनराव गीते, नानाभाऊ नामदेव फुलसुंदर, दीपककुमार दशरथ महाले, ज्ञानदेव वामन कदम, शरद बाळासाहेब दंडवते, बिरा गेणू शिंदे, साळभाऊ रखमा शिंदे, हरीच्छंद्र सुरेश गायकवाड, सुभाष मनोहर सोनवणे, महादु पांडुरंग गायकवाड, अलका पाटीलबुवा कोठावळे यांच्या नव्याने नियुक्त्या झालेल्या आहेत.

या निवडीवेळी सरपंच राणीताई मुकुंद नरवडे, माजी सरपंच विलास थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दरवडे, माजी चेअरमन आनंदा गायकवाड, माजी चेअरमन दत्तात्रय गायकवाड, माजी चेअरमन दिलीप महाले, माजी चेअरमन नाना शिंदे, माजी सरपंच शशिकांत वाव्हळ, शिवसेना तालुका प्रमुख गणेश जामदार, माजी उपसरपंच सुरेश गायकवाड, माजी उपसरपंच दत्तोबा दंडवते, माजी उपसरपंच रामभाऊ बोडरे, ग्राम पंचायत सदस्य दीपक दंडवते, ग्राम पंचायत सदस्य रामभाऊ गायकवाड, युवा उद्योजक सागर दंडवते, सामाजीक कार्यकर्ते मंगेश दंडवते, सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे प्रमोद दंडवते, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब दंडवते, आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

ही निवडणूक सहकार खात्याचे शिरूरचे सहाय्यक निबंधक, एस एस कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी अधिकारी श्रेणी २, शिरूरचे गजानन पुंड यांच्या अधिपत्याखाली, तसेच सोसायटीचे सचिव मोहन वाव्हाळ तसेच सुखदेव खर्डे यांच्या नियोजनात पार पडली. नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळींना राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे व अनेक मान्यवरांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्यात.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *