आपला आवज न्युजनेटवर्कचे आंबेगाव ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी यांना आदर्श पत्रकारितेचा आंबेगाव भुषण पुरस्कार

लक्ष्मण दातखिळे
बातमी प्रतिनिधी
१५ एप्रिल २०२२ 

आंबेगाव 


घोडेगाव तसेच आंबेगाव तालुका पंचक्रोशित आपला आवाज न्युज नेटवर्कच्या माध्यमातून व गेले १० वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने निर्भीड व उत्कृष्ट पत्रकारिता करत असल्यामुळे तसेच आदिवासी पश्चिम पट्टयातील गोरगरिबांचे प्रश्न व जनेतेचे विविध समस्या आपल्या बातमीदारीतून सोडवल्याने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आंबेगाव भूषण सन २०२१ -२२ या वर्षाचा पत्रकारितेचा आदर्श पुरस्कार आपला आवाजचे आंबेगाव ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी यांना देण्यात आला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून युगप्रवर्तक प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हा पुरुस्कार देण्यात आला आहे.राज्याचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झालाय. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ तसेच भव्य ट्रॉफी देवून पत्रकार मोसीन काठेवाडी यांना आंबेगाव भूषण पुरुस्काराने गौरविण्यात आले.

या प्रसंगी सिनेअभिनेते मुळशी पॅटर्न अमन देवान, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे या चित्रपटाचे अभिनेते मयुरेश महाजन, शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे,शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ प पांडुरंग महाराज येवले, पोलिस उपायुक्त श्रीप्रकाश वाघमारे,युगप्रवर्तक प्रतिषठाणचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात, उदयोजक गणेशभाऊ कोकणे, बी.डी काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव,घोडेगावचे सरपंच क्रांती गाढवे , उपसरपंच सोमनाथ काळे, शरद सहकारी बँकेचे संचालक रूपाली झोडगे, महिला दक्षता समितीचे अध्यक्ष रत्ना गाडे, घोडेगाव राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष ज्योती घोडेकर,यशवर्धीनी बचतगटचे कुमार घोलप, आंबेगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकीत जाधव, युगप्रवर्तकच्या संचालिका कविता खरात, पूनम दुधवडे, अमित रोकडे , दयानंद मोरे , प्रसिद्ध निवेदक प्रकाश बोऱ्हाडे ,निलेश पडवळ सर्व आंबेगाव भुषण पुरुस्कारर्थी,शिक्षक तसेच घोडेगाव व पंचक्रोशितील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *