सुयोग डायग्नोस्टिक सेंटर आळेफाटा व मुंबईकर मंडळ डिंगोरे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर संपन्न

दीपक मंडलिक
माळशेज प्रतिनिधी
१२ एप्रिल २०२२


सुयोग डायगणोस्तिक सेंटर आळेफाटा व मुंबईकर मंडळ डिंगोरे यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ता देवी यात्रा उत्सव निमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगोरे येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिराचे उद्घाटन कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर याचे हस्ते पार पडले यामध्ये मेडिकव्हर हॉस्पिटल चे डॉ. संदिप बोरले डॉ. अनुप्रीत सातपुते डॉ.प्राची वायकर संतोष गोडसे दीपक जाधव कणसे मेडिकल कॉलेज चे प्राचार्य डॉ. कमलेश घोलप डॉ. सोमण डॉ. महिमा हातनोलकर मनोहर डोळे फाउंडेशन चे डॉ. सुरज सदांशीव सतीश धोंगडे डॉ. विश्वास फाफाळे भोलेनाथ काळे सुयोग डायग्नोस्टिक सेंटर चे संचालक डॉ. श्रीकांत कोकाटे दिगंबर औटी कैलास वाळुंज राजेंद्र बोऱ्हाडे उपस्थित होते ,या शिबिरामध्ये ऐकून 570 रुग्णानी सहभाग घेतला.

 

10 गरीब रुग्णाचा डोळ्याच्या ऑपरेशन चा खर्च नवनिर्वाचित मुंबईकर मंडळ यांनी स्वीकारला 35 रुग्णाचे छोटे मोठे ऑपरेशन व उपचार मेडीकव्हर हॉस्पिटल संगमनेर यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया होणार आहेत 110 श्रमिकांनी इ श्रम कार्ड नोंदणी केली यासाठी गौरव चव्हाण इम्तियाज तांडेल कार्तिक गुंजाळ पूर्वा कुटे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सभासद, ग्रामविकास कमिटी,सप्ताह कमिटी,यात्रा कमिटी,तंटामुक्त कमिटी,समस्त ग्रामस्थ डिंगोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. असे सुयोग डायग्नोस्टिक सेंटर चे संचालक राजेंद्र बोऱ्हाडे यांनी सांगितले….

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *