शरद पवार यांच्या घरावरील हल्याच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी पक्षाने आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरूर येथे केला निषेध

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
११ एप्रिल २०२२

शिरूर


राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या राहत्या घरावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवार दि. ९ एप्रिल २०२२ रोजी, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी तोंडाला काळे मास्क लावून व हाताला काळ्या फिती बांधून शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. तसेच शिरूर तहसील कार्यालय व शिरूर पोलिसांना यावेळी निषेधाचे निवेदनही देण्यात आले. यात म्हटले आहे की, “आमचे श्रद्धास्थान शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर काही समाजकंटकांनी हल्ला केला. त्या हल्ल्याचा निषेध शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीरपणे करण्यात येत आहे.” तसेच यात असेही म्हटले आहे की, “भारतीय जनता पार्टीने सुपारी दिलेला वकील गुणरत्न सदावर्तेने, काही समाजकंटकांना फूस लावून आमच्या श्रध्दास्थानावर भ्याड हल्ला केला आहे. त्या गुणरत्नेवर तसेच हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच, त्यांच्या पाठीशी असणाऱ्या शक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. तसे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.” असे निवेदनात म्हटलेले आहे.


यावेळी आमदार अशोक पवार यांच्यासह, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पा., राष्ट्रवादीचे शिरूर तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, पुणे जिल्हा सहकारी दुध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, डायरेक्टर स्वप्नील ढमढेरे, डायरेक्टर निखिल तांबे, जी प सदस्य राजेंद्र जगदाळे पा., शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतकाका कोरेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीरखान पठाण, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष ऍड सुदीप गुंदेचा, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी सभापती शंकर जांभळकर, माजी उपसभापती विश्वास ढमढेरे,माजी उपसभापती प्रवीण चोरडिया व संचालक बंडू जाधव, शिरूर शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवक शहराध्यक्ष रंजन झांबरे, तालुका युवकाध्यक्ष सागरराजे निंबाळकर, युवक तालुका उपाध्यक्ष अमोल वर्पे, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष महादेव जाधव, माजी शहर उपाध्यक्ष अमोल चव्हाण, उद्योग व व्यापार विभाग पुणे जिल्हाध्यक्ष सुभाष गव्हाणे, कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, रा प घोडगंगा सह साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब फराटे, संचालक प्रा सुभाष कळसकर, तज्ञ संचालक धरमचंद भवरीलाल फुलफगर, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष निलेश पवार, लीगल सेलचे शहराध्यक्ष ऍड रवींद्र खांडरे, सरदवाडीचे माजी उपसरपंच कृष्णा घावटे, आंबळे चे सरपंच सोमनाथ बेंद्रे, सुरेश पाचर्णे, सागर नरवडे, सागर पांढरकामे, महेश भुजबळ, सोशल मीडियाचे जितेंद्र काळे, प्रशांत पवार व सचिन खरात, उमेश नरवडे उपस्थित होते.


त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या तालुका महिलाध्यक्षा विद्या भुजबळ, शिरूर तालुका युवती अध्यक्षा संगीता शेवाळे, शहर युवती अध्यक्षा तज्ञीका कर्डिले, शहर युवती उपाध्यक्षा ऍड सरिता खेडकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्यातील अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *