शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा पुण्यात सत्कार

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२५ मार्च २०२२

बेल्हे


पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच, पुणे या ठिकाणी इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२१ परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर बेल्हे (ता. जुन्नर) विद्यालयातील निवेदिता नितीन मुळूक हिस इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केल्याबद्दल पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

श्री बेल्हेश्वर च्या निवेदिता मुळूक हीचा सन्मान

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा अजित पवार हे होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे आयुष प्रसाद,उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे रणजित शिवतरे व शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे जिल्हा परिषद संध्या गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य बेलकर आर. के. यांनी दिली तसेच निवेदिता मुळूक हिस विद्यालयाची स्कुल कमिटी, ग्रामस्थ,विद्यालयातील शिक्षक यांनी सन्मान मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *