बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे मधील महिला प्राध्यापकांनी गिरविले योग प्रशिक्षणाचे धडे

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२४ मार्च २०२२

आळे


ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे, (ता.जुन्नर) संतवाडी ,कोळवाडी संचलित मा. बाळासाहेब जाधव महाविद्यालय आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २१ ते २४ मार्च या कालावधीमध्ये योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचे मन आणि आरोग्य निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण जाधव यांनी सांगितले.


महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांनी निरोगी आरोग्याचा संकल्प या शिबिराच्या माध्यमातून केला.शिबिरामध्ये ३० महिला प्राध्यापकांनी सहभाग नोंदवून योग साधनेचे महत्त्व जाणून घेतले. योग प्रशिक्षक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे राज्य समन्वयक बाळासाहेब ढमाले , सुवर्णा मुळे ,संगीता ढमाले , भारती देवरुखकर , अण्णासाहेब वाकचौरे , डॉ. तुषार झोपे , विलास बामणे ,तुषार कोऱ्हाळे यांनी प्रशिक्षणार्थींना कडून योग आणि ध्यानधारणेचा सराव करून घेतला. आणि त्यांना या शिबिरामध्ये श्वासावर आधारित असलेली सुदर्शन क्रिया शिकविली.

योगासनांमुळे शरीर व मन निरोगी, ताजेतवाने व तंदुरुस्त होईल व दगदगीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीत शिबिरातील मार्गदर्शक प्रणालीचा दैनंदिन जीवनामध्ये अवलंब करावा असे प्रतिपादन ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष भाऊदादा कुऱ्हाडे यांनी या शिबिराच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अर्जुन पाडेकर, उपाध्यक्ष उल्हास सहाणे, सचिव बाळासाहेब गुंजाळ, खजिनदार रोहिदास पाडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न अण्णा डोके, किशोर कुऱ्हाडे, बबनराव सहाणे, गंगाराम गुंजाळ, माऊलीशेठ कुऱ्हाडे , संपत गुंजाळ , अरुण हुलवळे, राजू कुऱ्हाडे ,तुकाराम गाढवे उपस्थित होते. शिबिराचे नियोजन महाविद्यालयाचे योग प्रशिक्षक प्रा. डॉ. अरुण गुळवे , क्रीडाशिक्षक रावसाहेब गरड , प्राध्यापक संजय वाकचौरे , प्राध्यापिका नूतन जोशी , शुभम गुंजाळ यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *