श्री क्षेत्र ओझर येथील ग्रामसेवक प्रदीप रामदास खिलारी जिल्हा परिषद पुणे येथील आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने पुरस्कृत

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
२१ मार्च २०२२ 

ओझर


पुणे जिल्हा परिषद पुणे पुरस्कृत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार श्री क्षेत्र ओझर येथील ग्रामसेवक श्री. प्रदीप रामदास खिलारी यांना सन २०२०/२०२१ चा आदर्श पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला ताई पानसरे उपाध्यक्ष रणजीतदादा शिवतारे ,मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , सभापती कृषी, आरोग्य, पशुसंवर्धन, समाजकल्यान , महिला बालकल्याण, पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकरी अधिकारी सचिन घाडगे व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी खिलारी भाऊसाहेब यांचे वडील रामदास खिलारी व आई, शिंदे गावच्या माजी सरपंच कुंदाताई खिलारी ,ओझर गावचे सरपंच मथुरा कवडे, उपसरपंच विठ्ठल जाधव,सदस्य अनिल मांडे,सदस्या राजश्री कवडे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष दत्तात्रय कवडे तसेच ओझर नवीनचे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भास्कर मार्तंड कवडे (गुरुजी), मिरा जगदाळे , सचिन कवडे तसेच त्यांचे जुन्नर तालुका ग्रामसेवक संघटना पदाधिकारी गवारी भाऊसाहेब व इतर सहकारी मित्र ,उत्तम भुजबळ व इतर यावेळी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *