बिबट्याचा पायी चालणाऱ्या महिलेवर हल्ला ;ओतूर परिसरातील घटना

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
२१ मार्च २०२२

ओतूर


ओतूर (ता.जुन्नर) येथील आवळी – ओतूर रस्त्यावर मीराबाई दिलीप गाढवे या महिला रविवार दि:-२०मार्च रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पायीचालत असताना बिबट्याने अचानक पाठीमागून हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्याने महिला घाबरून मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने जवळच असलेल्या शेतात धूम ठोकली मात्र या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत.

बिबट्याचा पायी चालणाऱ्या महिलेवर हल्ला

या हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाचे ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे ,वनपाल एस.एम.गिते, वनरक्षक अतुल वाघोले आणि वनसेवक साहेबराव पारधी व फुलचंद खंडागळे ही टीम घटनास्थळी पोहचले त्यांनतर जखमी महिलेला ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ दाखल करून याठिकाणी त्यांनी जखमी महिलेवर प्राथमिक उपचार करून घेऊन पुढील उपचारासाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले आता महिलेची प्रकृती ठीक आहे. आपला परिसर हा बिबट प्रवण क्षेत्र असल्याने सकाळी चालण्यासाठी बाहेर जाताना शक्यतो दिवस उजाडल्यानंतर व समूहाने जावे ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळेस प्रवास करताना आणि शेतात काम करताना काळजी घेण्याचे आवाहन वनविभागामार्फत प्रवण क्षेत्रातील ग्रामस्थांना करण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *