नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचा एकतर्फी विजय

विशेष प्रतिनिधी
१५ मार्च २०२२

नारायणगाव


नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी १२ जागांवर बहुमताने विजय मिळविला. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांनी दिली. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे हे सर्वात जास्त मते मिळवून निवडून आले आहेत. तसेच आपला आवाज न्यूज नेटवर्क चे कार्यकारी संपादक किरण वाजगे हे देखील बहुमताने निवडून आले आहेत.

सरपंच योगेश पाटे, राजेश मेहेर, संजय वारुळे, ज्ञानेश्वर औटी यांच्या शिरपेचात मानाचा तुरा

या निवडणुकीत श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनल व श्री मुक्ताई,हनुमान,भागेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनल यांच्यात जोरदार लढत झाली. ही निवडणूक एकतर्फी व बहुमताने जिंकल्यामुळे पॅनल प्रमुख सरपंच योगेश पाटे, सरपंच राजेश मेहेर, संजय वारुळे, राहुल बनकर, आशिष फुलसुंदर, माजी सरपंच अशोक पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे, अशिष माळवदकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


८३ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोसायटीची निवडणूक झाली आहे. इतर मागास प्रवर्गातून श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचे अरुण हरिभाऊ कोल्हे हे बिनविरोध निवडून आले होते . १२ जागांसाठी झालेल्या लढतीमध्ये श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचे सर्वसाधारण गटातून संतोष बबन खैरे, सिताराम आत्माराम खेबडे, किरण लक्ष्मण वाजगे, कैलास दत्तात्रय डेरे, रामदास जिजाबा तोडकरी, राजेंद्र देवराम पाटे, चंद्रकांत पिराजी बनकर, बाळासाहेब केरू भुजबळ, महिला प्रतिनिधी गटातून आरती संदिप वारुळे, सीमा संदेश खैरे, अनुसूचित जाती जमाती गटातून – मारुती जानकू काळे, भटक्या विमुक्त जाती व विशेष प्रवर्ग गटातून – बाबाजी येड्डू लोखंडे हे बहुमताने निवडून आले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *