नेहमी गजबजलेल्या विविध विषय समित्यांच्या कक्षांना लागले टाळे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१४ मार्च २०२२

पिंपरी


महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, नवी मुंबई, नाशिक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पालिकेच्या सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात आला. त्याठिकाणी प्रशासकीय राजवट लागू केली आहे. आता पदावर असणारे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष सगळी पदे बरखास्त झाली आहेत. आता सगळा कारभार महापालिकेचे आयुक्तांच्या हाती आला आहे. आता आयुक्तांनी सर्व कामे सुरळीत चालवण्यासाठी समिती बनवली आहे. कामांची विभागणी करून कामे विभागून देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर, सत्ताधारी पक्षनेते, विरोधी पक्षनेते , क्रीडा सभापती, या सर्व कक्षांना प्रशासनाकडून ताळे लावण्यात आले आहे. नेहमी पत्रकार बातम्यांसाठी विविध कशात जात होते. चर्चा घडत असे ते आता सर्व बंद झाले. आता पत्रकारांना पत्रकारक्षात टीव्ही पाहत आणि गप्पा मारत बसण्याची वेळ आली आहे. ही पालिकेच्या इतिहासातील पहिली वेळ आहे.याच महापौर, पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि पदाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये काम करणारे शिपाई, कर्मचारी यांना पुढील आदेश न आल्यामुळे आदेशाची वाट पाहत बसावे लागले असल्याचे निदर्शनास आले.


 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *