अजमेरा प्रभागातील चारही नगरसेवकांच्या प्रयत्नातून २० लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठ्याची टाकी आणि पंपाचे उदघाटन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
११ मार्च २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच प्रभागातील नागरिकांना सध्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सध्या दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. पाणी प्रश्नावर नेहमीच नागरिकांची ओरड सुरू असते. नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच सगळ्याच प्रभागात नगरसेवक प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावताना दिसत आहे.

अजमेरा खराळवाडी प्रभागातील सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग प्रभाग क्र.९ मधील खराळवाडी, गांधीनगर, भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न भेडसावत होता त्यासाठी चारही नगरसेवकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून या भागातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन आज दि.११ मार्च २०२२ रोजी करण्यात आले. येथील नागरिकांच्या मागणीनुसार सदर ठिकाणी २० लाख लिटर क्षमतेची पाण्याची उंच टाकी व १० लाख लिटर क्षमतेच्या पंप च्या कामाची उभारणी करण्यात आली.

हा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी प्रभागातील नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, गीता मंचरकर, वैशाली घोडेकर, यांच्या प्रयत्नातून खराळवाडी, गांधीनगर व कामगारनगर परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सदर उदघाटनाला रामनाथ टकले, कार्यकारी अभियंता किरण अंदुले, उपअभियंता, विपीन थोरमोठे, कनिष्ठ अभियंता आणि मोजके नागरीक उपस्थित होते. या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा कामामुळे नागरिकांनी तेथे येऊन सर्वच नगरसेवकांचे आभार मानले. आणि या कामाचे कौतुकही केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *