शिरदाळे येथे ग्रामपंचायतच्या वतीने महिला दिन विविध उपक्रम करून उत्साहात साजरा

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०९ मार्च २०२२

आंबेगाव


उपसरपंच मयुर सरडे यांच्या वतीने महिलांना मिठाई वाटप तर हळदी कुंकू आणि संगीत खुर्चीचे ग्रामपंचायत कडून आयोजन

शिरदाळे ता.आंबेगाव याठिकाणी प्रथमच महिला दिन एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत च्या वतीने बोलावण्यात आलेल्या महिला विशेष ग्रामसभेत महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून आपल्या शंका मांडल्या त्याचे निरसन ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ.वंदना गणेश तांबे, उपसरपंच श्री.मयुर संभाजी सरडे ,सदस्य बिपीन पंढरीनाथ चौधरी यांनी केले. यावेळी पोलीस पाटील सौ.कल्पना चौधरी, मा.सरपंच सुनीता चौधरी ,आशा वर्कर सविता मिंडे यांनी मनोगत व्यक्ती केले.

उपस्थित महिलांना ग्रामपंचायत च्या वतीने महिलादिनानिमित्त उपसरपंच श्री.मयुर सरडे यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले. तसेच यावेळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम देखील घेण्यात आला. मग उपस्थित महिलांचा उत्साह पाहता सरपंच वंदना तांबे यांच्या पुढाकाराने संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेण्यात आला. यात तब्बल पन्नासहून जास्त महिलांनी सहभाग घेऊन आनंद साजरा केला. यात प्रथम क्रमांक सौ.सुनीता चौधरी,द्वितीय क्रमांक सौ.शांता पडवळ,तृतीय क्रमांक सौ.मनीषा मिंडे यांनी पटकावला. यावेळी देखील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


कार्यक्रमाच्या शेवटी माझी वसुंधरा शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सरपंच सौ.वंदना तांबे,उपसरपंच श्री.मयुर सरडे,सदस्य बिपीन चौधरी,सुप्रिया तांबे,ग्रामविकास अधिकारी शिरसाठ भाऊसाहेब,पोलीस पाटील सौ.कल्पना चौधरी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गणेश तांबे,मा.सरपंच निवृत्ती तांबे,शंकर तांबे ,मुख्याध्यापक श्री.दिलीप गाढवे सर, अंगणवाडी सेविका शांताबाई चौधरी, मदतनीस सौ.जया रणपिसे ,मा.सरपंच जिजाबाई तांबे तसेच अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *