पूर्णानगर चिंचवड येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने भिरकावली चप्पल

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०७ मार्च २०२२

चिंचवड


प्रभाग क्रमांक ११ पूर्णानगर चिंचवड येथे माजी पक्षनेते नगरसेवक एकनाथ पवार यांच्या संकल्पनेतून आणि भाजपच्या नगरसेवकांच्या प्रयत्नातून अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटन समारंभाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते. तेव्हा फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा उदघाटना स्थळी आत जात असतानाच गर्दीतून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर चप्पर भिरकावल्याची घटना तेथे चित्रीकरण करत असलेल्या पत्रकारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली . ही बातमी वाऱ्यासारखी शहरभर पोहचली व त्याचीच चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत होती.

असे घडले रामायण, महाभारत

या उद्यानाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करणार असल्याचे अगोदरच जाहीर केले होते. त्यामुळे मोठा पोलीस फौजफटा कार्यक्रम ठिकाणी अगोदर च होता रस्त्याचे दोन्ही बाजूने नाकाबंदी करून कोणत्याही कार्यकर्त्यांची , पत्रकारांचीही वाहने आत सोडली जात नव्हती. सुरवातीला कार्यक्रम स्थळी पिंपरी चे आमदार अण्णा बनसोडे आणि माजी आमदार विलास लांडे चार चाकीतून गाडीतून आले. तेव्हा त्यांच्या मागे चालत एका बाजूने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे , विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी शहराध्यक्ष संजोग वाघिरे पाटील, नगरसेवक मयुर कलाटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, कुशाग्र कदम. कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह अगदी गोविदांची मटकी फोडायच्या आवेशातच डोक्याला काळ्या पट्ट्या परिधान करून आक्रमकतेने समोर आले. तर दुसरीकडून माजी नागरसेवक नारायण बहिरवाडे, नगरसेवक राहुल भोसले, विनोद नढे, पंकज भालेकर, महिला शहाराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, नगरसेविका मंगला कदम, अनुराधा गोफने, जालिंदर शिंदे , व असंख्य कार्यकर्ते घोषणा देत जमा झाले.

खऱ्या अर्थाने निवडणुकीचे बिगुल वाजल्याची चर्चा सगळीकडे ऐकायला मिळाली

त्यावेळी आमदार बनसोडे , माजी आमदार विलास लांडे आणि पोलिसांमध्ये ‘ तू तू मै मै ‘ झाली तेव्हा बनसोडे आणि लांडे यांनी पोलिसांना सांगितले आम्ही फक्त देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आलो आहोत. बाजूला उभे राहुन वाट पाहतो. तर संजोग वाघिरे आमचे नेते अजितदादा पवार कार्यक्रम असल्यावर विरोधक अलेवर त्यांना भेट देतात असे समजावत असतानाच समोरून प्रचंड गर्दी केलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हातात विविध घोषणा लिहिले फलक आणि झेंडे घेऊन भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्याचवेळी तेथेच उभे असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनीही कार्यक्रम स्थळावरून भाजपचे झेंडे आणून मोदी…मोदी… मोदी आणि जय श्री राम, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण तंग झाले. दोन्ही बाजूने समोरासमोर आलेल्या कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेमुळे एकच गोंधळ उडाला. आणि तेथे आलेल्या नेत्यांचे कोण्हीही ऐकेनासे झाले.

याच गोंधळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रम स्थळाकडे येत असल्याचे पोलिसांना समजले. पोलीस अधिकाऱ्यांनी आदेश देताच पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारा सुरू केला. त्यात माजी नगरसेविका शमीम पठाण जखमी झाल्या. सौम्य लाठीमारामुळे तेथील गर्दी पांगली पण त्याच गोंधळात जेव्हा फडणवीसांच्या गाड्यांचा ताफा कार्यक्रमस्थळी आत जात असतानाच गर्दीतून अज्ञात वेक्तीने फडणवीसांच्या ताफ्यावर चप्पल भिरकावली.यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या डोक्याचा ताप वाढला असून ते या अज्ञाताचा शोध घेत आहेत.झालेल्या प्रसंगामुळे जेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर फडणवीस बाहेर जात असताना पत्रकारांनी प्रश्न विचारण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता न बोलताच पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.

अशा सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन चप्पल भिरकावने योग्य आहे ? असा प्रश्न जनतेला पडला आहे. त्याची चर्चा उद्यान पाहायला येणाऱ्या नागरिकांमध्ये चांगलीच रंगली होती.या चप्पल नाटयानंतर पिंपरी चिंचवड भाजपच्या नेत्यांच्या मनात ही खदखद नक्कीच असणार आहे. याचा वचपा काढण्याची संधी ते सोडणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते. आता निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना अजून काय काय पाहायला मिळणार हे येणारा काळच सांगेल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *