४५ हजाराचे ६० हजार वसून अजून २८०००० साठी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ओढून नेणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०५ मार्च २०२२

घोडेगाव


अनेक ठिकाणी अजूनही खाजगी अवैध सावकारी जोरात सुरु आहे शेतकऱ्यांच्या मजबुरीचा आणि त्यांच्या साधेपणाचा फायदा घेत त्यांना अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज देऊन मालमत्ता ताब्यात घेण्याचे प्रकार आजही सर्रास घडत आहेत.आंबेगाव तालुक्यातील फिर्यादी आशिष नवनाथ घुले(वय ३२.वर्षे )यांनी आरोपी महादेव बजाबा हुले रा.मुंबई,( मूळगाव नारोडी,ता.आंबेगाव, जि.पुणे ) यांच्याविरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की आरोपी महादेव बजाबा हुले हे इसम त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा सावकारी परवाना नसताना अवैद्यारीत्या बेकायदा सावकारकीचा व्यवसाय करतात त्यांनी फिर्यादी आशिष नवनाथ घुले यांना ४४०००/-रुपये १२%टक्के मासिक व्याजदराने देऊन त्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेतला त्यांना जबरदस्तीने वेठीस धरून दिलेल्या रकमेच्या व्याजाच्या स्वरुपात त्यांच्याकडून रोख रक्कम व बँक व्यवहाराद्वारे १ लाख १४००० घेतली असून आणखी व्याज देण्याची मागणी आरोपी करत आहे आरोपीच्या सांगण्यावरून प्रमोद तुकाराम हुले आणि आशिष तुकाराम हुले( रा.नारोडी,ता.आंबेगाव,जि .पुणे )यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत तसेच दमदाटी करून अंदाजे ३,००,०००/- रुपये किंमतीचा महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रक्टर जबरदस्तीने कोठेतरी अनोळखी ठिकाणी घेऊन गेले आहेत.

सदर आरोपीविरुद्ध घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जीवन मानेंच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डौले करत आहेत .


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *