नारायणगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास आघाडीची अधिकृत घोषणा

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०३ मार्च २०२२

नारायणगाव


नारायणगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी श्री मुक्ताई हनुमान भागेश्वर शेतकरी विकास पॅनल च्या वतीने आज नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताई देवीचे आशीर्वाद घेऊन पॅनल मधील उमेदवारांची नावे अधिकृतपणे घोषित करण्यात आली. याप्रसंगी श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास आघाडी या पॅनल मधून इतर मागासवर्ग या गटातून बिनविरोध निवडून आलेले अरुण आबा कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पॅनल प्रमुख संतोष नाना खैरे, सरपंच योगेश पाटे, उद्योजक संजय वारुळे, एकनाथ शेटे, ज्ञानेश्वर औटी आशिष फुलसुंदर, वारूळवाडी चे सरपंच राजेंद्र मेहेर, जांबुवंत कोल्हे, संतोष वाजगे, हनुमान देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष राजकुमार कोल्हे, किशोर कोल्हे, माजी सरपंच अशोक पाटे, राहुल शेठ बनकर, आशिष माळवदकर, विकास नाना तोडकरी, संजय खैरे, अजित वाजगे, ईश्वर पाटे, हेमंत कोल्हे, जालिंदर खैरे, आकाश कानसकर, प्रशांत खैरे उपस्थित होते.

मी श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर पॅनलचाच उमेदवार – अरुण आबा कोल्हे

यावेळी उमेदवार संतोष नाना खैरे, राजेंद्र देवराम पाटे, रामदास तोडकरी, कैलास डेरे, सिताराम खेबडे, बाळासाहेब भुजबळ, चंद्रकांत बनकर, अरूण आबा कोल्हे, आरती संदिप वारुळे, सीमा संदेश खैरे, बाबाजी लोखंडे, मारुती काळे व किरण वाजगे आदी मान्यवर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.याप्रसंगी संतोष नाना खैरे व योगेश पाटे बोलताना म्हणाले की, हा नारायणगाव आणि वारूळवाडी या दोन गावांचा पॅनेल आहे. यामध्ये सर्वपक्षीय तसेच सर्वसमावेशक उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. आम्ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र विरोधकांनी ही निवडणूक लादली आहे.

बिनविरोध संचालक झालेले अरुण कोल्हे यांचा सत्कार

बिनविरोध निवडून आलेले संचालक अरुण आबा कोल्हे म्हणाले की, विरोधकांनी किती वावड्या उठवल्या तरी मी श्री मुक्ताई भागेश्वर हनुमान शेतकरी विकास आघाडी याच पॅनलचा उमेदवार म्हणून बिनविरोध निवडून आलो आहे.
यावेळी संजय वारुळे, आशिष फुलसुंदर, सरपंच राजेंद्र मेहेर, उद्योजक राहुल बनकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत श्री मुक्ताई हनुमान भागेश्वर शेतकरी विकास आघाडी पॅनल चे सर्व उमेदवार सर्वसमावेशक व लोकाभिमुख असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *