दैनंदिन समस्यांवर, अडीअडचणींवर मात करण्याचे बळ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्कार शिबिरातून मिळते – प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०२ मार्च २०२२

घोडेगाव


घोडेगाव  येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी. काळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबिर नुकतेच आमोंडी ता. आंबेगाव जि.पुणे येथे संपन्न झाले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून जीवन माने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेशशेठ काळे हे होते.आपल्या भाषणात जीवन माने पुढे म्हणाले की, घोडेगाव पोलीस स्टेशनने आमोंडी गावाच्या परिपूर्ण विकासासाठी ज्या विविध प्रकारच्या सूचना केल्या त्यासर्व सूचनांचे आमोंडी ग्रामस्थांनी नम्रपणे पालन केल्यामुळेच हे गाव आदर्श ठरलेले आहे. गावाच्या विकास व जडणघडणीमध्ये या विविध सूचना फलदायी ठरलेल्या आहेत. गावातील विविध समस्यांचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा, असे ते शेवटी म्हणाले. या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड म्हणाले की, दैनंदिन समस्यांवर, अडीअडचणींवर मात करण्याचे बळ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्कार शिबिरातून मिळते.कलागुणांचेही संस्कार विद्यार्थ्यांवर होत असतात. भविष्यातील अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य अशा प्रकारच्या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळत असते. विविध सुविधांचा वापर या गावाने केल्यामुळे हे गाव आदर्शगाव ठरलेले आहे.

आजचे विद्यार्थी भविष्यामध्ये समाजातील राजकीय, प्रशासकीय, कृषी,औद्योगिक इ.श्रेत्रात आपल्या कामाचा ठसा निर्माण करतील. त्यासाठीया शिबिरांमधून गटचर्चा, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, गाव पाहणी, गावातील समस्या विद्यार्थ्यांनी समजून घेतल्यामुळे भविष्यामध्ये नक्कीच त्यांना या सर्व गोष्टीचा फायदा होईल.असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले. याप्रसंगी आमोंडीचे सरपंच निलेश काळे, रामभाऊ फलके, समन्वय समितीचे चेअरमन संतोष भास्कर, संस्थेचे संचालक जयसिंगराव काळे,संस्थेचे सल्लागार कैलासबुवा काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.समारोप प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष शिवाजीराव घोडेकर, स्कूल कमिटीचे चेअरमन अजितशेठ काळे, संस्थेचे खजिनदार शिवदास काळे, उपप्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर,प्रकल्प कार्यालयाचे अधीक्षक योगेश खंदारे,शंकर टेकवडे,शंकर खंडागळे,उपसरपंच शंकर काळे,वसंतशेठ फलके, नवनाथ फलके, अविनाश फलके,योगेश फलके,सुनील फलके,ज्ञानेश्वर काथेर,प्रा. विशाल फलके,सुहास शिंदे, माऊली फलके,विलास फलके,आकाश फलके, जालिंदर कुरणे, कार्यालयाचे अधीक्षक अशोक काळे,प्रा. सुनील नेवकर,प्रा.महेश गाडेकर इ. मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात प्रबोधनपर व्याख्यानमाला संपन्न झाली.यात ‘सामाजिक विकास’,’राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्व विकास’,’ आदिवासी विकास व शासकीय योजना’,’सर्पदंश उपचार, संभाषण कौशल्य’,’चंदन लागवड, वनशेती आणि पर्यावरण’ इ. विषयावर श्री. सुरेश काळे(पुणे), डॉ.श्रीकांत फुलसुंदर (नारायणगाव),डॉ.अमोल वाघमारे (पुणे),डॉ.सदानंद राऊत(नारायणगाव), डॉ. गणेश सोनवणे (पाबळ),डॉ.महेंद्र घागरे यांची अनुक्रमे व्याख्याने संपन्न झाली. या श्रमसंस्कार शिबिरामध्ये पत्रकारांशी सुसंवाद या कार्यक्रमांमध्ये दै. सकाळचे पत्रकार चंद्रकांत घोडेकर, दै.लोकमतचे पत्रकार निलेश काण्णव, आपला आवाजया चॅनलचे आंबेगाव ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी इ.पत्रकारांनी विद्यार्थ्यांची सुसंवाद साधला. याशिवाय शिबिरांमध्ये ग्रामस्वच्छता,श्रमदान, वृक्षसंवर्धन,गटचर्चा,ग्रामसर्वे, सेंद्रिय शेती भेट, योगा व प्राणायाम, सामाजिक विषयावरील पोस्टर प्रदर्शन इ.विविध उपक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. वल्लभ् करंदीकर यांनी केले तर, सूत्रसंचालन डॉ. माणिक बोराडे यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.पोपटराव माने यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *