ठाकरवाडी रस्त्यावर साकव बांधण्यासाठी ६० लाख निधी द्या:- जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली मागणी.

रामदास सांगळे
विभागीय संपादक 
२२ फेब्रुवारी २०२२

जुन्नर


बेल्हे :

बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील प्रमुख जिल्हा मार्ग २१ ते सिद्धेश्वर मंदिर – ठाकरवाडी रस्त्यावर साकव बांधण्यासाठी रुपये अंदाजे ६० लक्ष इतका निधी मिळावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,आमदार अतुल बेनके यांच्याकडे केली आहे.

सिद्धेश्वर मंदिराजवळ ओढ्यावर को. प.बंधारा झाल्यामुळे या ठिकाणी नेहमी पाणी येते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना, दूध वाल्यांना,शेतकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी अडचण होते. आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार व जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बागले रावसाहेब यांनी समक्ष पाहणी करून ग्रामस्थांना बरोबर चर्चा केली होती. यावेळी प्रकाश जाधव, तबाजी शिंदे, सरपंच वैशाली जाधव,माजी उपसरपंच संतोष काळे, पत्रकार अशोक कोरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. रविवारी दि.२० रोजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार अतुल बेनके यांनी बोरी बुद्रुक येथील एस.आर. शिंदे यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पांडुरंग पवार यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. या साठी सुमारे ६० लक्ष रुपये निधी आवश्यक असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, पंचायत समिती सदस्य शाम माळी, शारदा शिंदे,प्रकाश जाधव,वैशाली जाधव, तबाजी शिंदे, किशोर दांगट, डॉ. उचगावकर, विलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *