अखेर बनावट बँक गॅरंटी सादर केल्याने सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीवर गुन्हा दाखल

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१२ फेब्रुवारी २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आरोग्य विभागांतर्गत अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रस्ते, गटर्स यांची दैनंदिन साफसफाई करणेबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. अनुषंगाने प्राप्त लघुत्तम दर निवेदा धारक पुण्यातील मे. सिक्युअर फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने निविदा अटी व शर्तीनुसार महानगरपालिकेस सादर करावयाच्या परफॉर्मन्स सेक्युरिटी डिपॉझिट रकमेपोटी सादर करावयाच्या एकूण रक्कम रुपये ६,९०,७१,०००/ एव्हड्या रकमेच्या स्टेट बँक ऑफ इंडिया एम जी रोड, फोर्ट, मुंबई या शाखेच्या बँक गॅरंटी महापालिकेस सादर केलेल्या होत्या. तथापि सदर बँक गॅरंटी या बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी पुराव्यानिशी केले होते आरोप

या कंपनीने बनावट कागदपत्रे सादर करून महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्या कंपनी विरोधात पालिकेच्या वतीने पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या प्रकारणाबत भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी सर्वसाधरण महासभेत पुराव्यानिशी आरोप केले होते. नंतर पत्रकार परिषद घेऊनही सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या भ्रष्टाचारी विरोधी लढा दिला होता त्याला यश आले आहे. अशी बरीच प्रकरणे नगरसेवक तुषार कामठे आणि नगरसेवक संदीप वाघेरे यांनी वारंवार बाहेर काढली होती. या प्रकरणात एका राष्ट्रवादी च्या माजी महापौरांचा हात असल्याचे कामठे यांनी सांगितले होते. निवडणूका जशा जवळ आल्या तसे राजकीय वातावरण तापायला लागले आहे. आत यापुढे अजून किती भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतात हे येणार काळाच सांगेल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *