भाजपचे गजानन चिंचवडे यांचे आकस्मित निधन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०५ फेब्रुवारी २०२२

चिंचवड


पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन पोपट चिंचवडे (वय – ५२) यांचे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आकस्मित निधन झाले. त्याच्या मागे पत्नी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि दोन मुले असा परिवार आहे. आज (दि ५ फेब्रुवारी) सकाळी अंघोळीसाठी बाथरुमध्ये गेले असताना  ते कोसळून पडले. लोकमान्य रग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणे बाकी आहे.

शहरात एका गजानना नंतर दुसरे गजानन गेल्याने दुःखाचे सावट

चिंचवडगामध्ये गणेशोत्सवामध्ये सामाजिक आणि पौराणिक विषयावरील अतिशय देखणे देखावे सादर करत असे. त्यांना सामाजिक कार्याची पहील्यापासूनच आवड होती. त्यांनी नुकताच १० वि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या उंबरठ्यावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अत्यंत होतकरू, कार्यकर्ते, अत्यंत मनमिळावू स्वभाव, सर्वांशी दांडगा संपर्क असलेले गजानन चिंचवडे यांच्या अचानक जाण्याची बातमी समजताच पिंपरी चिंचवड शहरात आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे गजानन चिंचवडे यांनी प्रा. रामकृष्ण मोरे सर यांच्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरु केला. पीसीएमटी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुढे महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य झाले. बारणे यांच्याबरोबर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत चिंचवडगाव येथून निवडणूक लढविण्यासाठी त्यांची तयारी सुरू होती. पण काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या जाण्याने हळहळ वेक्त होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *