गजानन बाबर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०५ फेब्रुवारी २०२२

वाकड


माजी खासदार स्वर्गीय गजानन बाबर यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाकड येथील त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची काल दि ४ फेब्रुवारी रोजी भेट घेतली. निवासस्थानी जाऊन गजानन बाबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला त्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी गजानन बाबर व त्यांचे बराच वेळ व्यासपीठावर संभाषण झाले त्या आठवणींना अजित पवार यांनी उजाळा दिला. गजानन बाबर यांच्या कार्याविषयी त्यांनी चर्चा केली.

गजानन बाबर यांनी वाई सातारा येथील वीर सहकारी साखर कारखान्यावर १८ वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते हे कोणीही विसरू शकत नाही असेही अजित पवार यावेळी म्हणाले. आणि त्यांच्या कार्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी गजानन बाबर यांचे बंधू मधुकर बाबर, प्रकाश बाबर, पुतणे आणि मुलगा योगेश बाबर , धीरज बाबर , सूरज बाबर, अमित बाबर, सुमित बाबर यांच्यासह शिवसेना गटनेते राहुल कलाटे , राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे , आणि उद्योजक दिलीप देशमुख उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *