गणेश जयंती निमित्त श्री विघ्नहराचे घेतले हजारो भाविकांनी दर्शन

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०५ फेब्रुवारी २०२२

नारायणगाव


गणेश जयंती दिनी अष्टविनायकांपैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहराचे दर्शन आज शुक्रवार दि. ४ रोजी पहाटे ०५ वाजता सुरु करण्यात आले. या निमित्ताने हजारो गणेश भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले याप्रसंगी ओझर येथील मुख्य प्रवेशद्वार ते भक्त भवन क्रमांक एक या रस्त्याचे भूमिपूजन देखील करण्यात आले. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, ,सचिव दशरथ मांडे, विश्वस्त राजश्रीताई कवडे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला व मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे गणेश जयंती निम्मित्ताने ” श्रीं ” ची महाआरती सकाळी ठीक ७.३० वा. अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. या महाआरतीसाठी ओझर गावातील दानशूर व्यक्तीमत्व श्रीमती आशाताई मधुकर मांडे, ह.भ.प.विशालमहाराज कलाटे, शंकरभाऊ जगताप , विजय डुबे , स्वप्नील काळे यांना आरतीचा मान देण्यात आला. आरतीचे मानकरी ह.भ.प. विशाल महाराज कलाटे यांनी श्री विघ्नहर्त्यास चांदीचे ४ लक्ष ५१ हजार रूपये किमतीचा मूषक दान म्हणून दिला. आशाताई मधुकर मांडे यांनी २ लक्ष ५१ हजार रूपये देवस्थान ट्रस्टच्या विकासकामांसाठी देणगी दिली. महाराष्ट्रातील अनेक भागांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले.

ओझर मुख्यप्रवेशद्वार ते भक्तभवन क्र.१ पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन

सकाळी १०.०० वा. मंदिरातून पालखीचे आंबेराई येथे प्रस्थान झाले. ह.भ.प गणेश महाराज वाघमारे यांचे गणेश जन्माचे कीर्तन झाले. बरोबर १२.३० वाजता गणेश जन्माच्या अभंगाचे गायन करून संपूर्ण मंदिरामध्ये फुलांची उधळण करून श्री गणेश जन्म साजरा करण्यात आला. ’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली.पहाटे पाच ते रात्री आकरापर्यंत रांगेत सुमारे सत्तर हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांसाठी मंदिरात मास्क, सेनीटाझर इत्यादी वापरणे बंधनकारक होते. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच भाविकांना दर्शन देण्यात आले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, शुद्ध पिण्याचे पाणी,अभिषेक व्यवस्था देणगी कक्ष,अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था,दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर बाग ,चप्पल स्टँड, पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली. सायंकाळी ६.०० वा हरिपाठ व रात्री ७ ते ९ या वेळेत ह.भ.प.रामेश्वर महाराज ढोले यांचे हरिकीर्तन झाले. वारकऱ्यांना नाष्टा अंबादास भिकाजी टेंभेकर यांसकडून व अन्नदान कै.मार्तंड रामचंद्र मांडे यांच्या स्मरणार्थ मांडे बंधू तसेच सुगंधाबाई गजानन घोगरे यांनी अन्नदान दिले. रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले.


श्री गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर येथे हायब्रीड अँन्युटी कार्यक्रमांतर्गत अष्टविनायक मार्गाची सुधारणा या विशेष फंडातून खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून सुमारे ३ कोटी २० लक्ष रूपये निधी मंजूर झाला आहे. या निधीतून श्री क्षेत्र ओझर येथे मुख्यप्रवेशद्वार ते भक्तभवन क्र.१ पर्यंतच्या सुमारे ८५० मीटर रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, युवा नेते अमित बेनके, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, सरपंच मथुरा कवडे, ओझर नंबर ३ च्या सरपंच तारामती कर्डक, ओझरच्या विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त मिलिंद कवडे यांच्या वतीने श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या अधिकृत वेबसाईट चे अनावरण करण्यात आले. गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर येडगाव जलाशयात सांयकाळी ठिक ६. वा जलाशयात विदयुत रोषणाईचे प्रेक्षपण ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले. संपूर्ण जन्मोत्सवाचे एल ई.डी स्क्रीन द्वारे थेट प्रेक्षपण विजय डुबे यांनी केले. आलेल्या मान्यवरांचे व गणेशभक्तांचे स्वागत देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे उपाध्यक्ष अजित कवडे, खजिनदार कैलास घेगडे,विश्वस्त बी.व्ही.अण्णा मांडे, रंगनाथ रवळे, आनंदराव मांडे, किशोर कवडे, गणपत कवडे, मंगेश मांडे, मिलिंद कवडे, कैलास मांडे, विजय घेगडे, श्रीराम पंडित यांनी केले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त व कर्मचारी यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *