आपला आवाज आपली सखी चा सखींसाठी अनोखा उपक्रम. पुणे मेट्रो मध्ये हळदी – कुंकू कार्यक्रमाचे आयोजन.

संगीता तरडे
विभागीय संपादिका
२९ जानेवारी २०२२

पिंपरी – चिंचवड

 


Aapla Awaj hosts unique event for Aapli Sakhi. Organizing Haldi-Kunku program in Pune Metro.
आपला आवाज आपली सखी चा सखींसाठी अनोखा उपक्रम. पुणे मेट्रो मध्ये हळदी – कुंकू कार्यक्रमाचे आयोजन.

पुणे महा मेट्रो, स्मार्ट सारथीचे उपक्रमास सहकार्य

आपला आवाज आपली सखी च्या वतीने दि. २९ जानेवारी रोजी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन वल्लभ नगर पिंपरी-चिंचवड येथे आपला आवाज आपली सखी सभासदांसाठी ‘ पुणे मेट्रो दर्शन व हाळदी कुंकू ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० पर्यंत कोवीड नियमांचे पालन करून हजारो सखींनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.

Your voice is a unique activity for your girlfriend. Organizing Haldi-Kunku program in Pune Metro. Special presence of Ameya Wagh, Lalit Prabhakar, Aditya Sarpotdar in 'Zombivali'
‘झोंबिवली ‘ चित्रपटातील अमेय वाघ, ललीत प्रभाकर, आदित्य सरपोतदार यांची विशेष उपस्थिती

‘झोंबिवली ‘ चित्रपटातील अमेय वाघ, ललीत प्रभाकर, आदित्य सरपोतदार यांची विशेष उपस्थिती

आपला आवाज आपली सखी च्या वतीने पुणे मेट्रो दर्शन व हाळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात विशेष बाब म्हणजे ‘ झोंबिवली ‘ चित्रपटाचे कलाकार अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी ही कार्यक्रमास उपस्थित राहून सखींसोबत फोटो घेत संवाद साधला. यावेळी उपस्थित कलाकार व आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी, पुणे मेट्रो चे डेप्युटी जनरल मॅनेजर मनोज कुमार डॅनियल, आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे, नगरसेविका मिनल यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सारथी स्मार्ट सीटी सल्लागार अमोल देशपांडे, महा मेट्रो च्या पब्लिक रिलेशन्स असोसिएट उज्वला ढेंगळे, विभागीय संपादक रोहित खर्गे, गजानन फूडस च्या संचालिका अनिता घारमळकर, सागर घारमाळकर तसेच सखी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फेसबूक स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.

Thousands of your friends took your voice to Pune Metro Darshan
हजारो आपला आवाज आपली सखी सभासदांनी घेतले पुणे मेट्रो दर्शन

हजारो आपला आवाज आपली सखी सभासदांनी घेतले पुणे मेट्रो दर्शन

‘पुणे मेट्रो दर्शन व आपला आवाज आपली सखी हळदी कुंकू समारंभ ‘ या संत तुकारामनगर पुणे मेट्रो स्टेशन येथील कार्यक्रमात आपला आवाज आपली सखी व पुणे मेट्रो यांच्या सहकार्यातून काही सखी सभासदांना व्यवसायिक स्टाॅल ही उपलब्ध करून देण्यात आले होते. उपस्थित सखी सभासदांनी  पुणे महा मेट्रो मध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम सोबतच मेट्रो मध्ये बसण्याचा आनंद घेत फोटो ही घेतले. उपस्थित सखी सभासदांनी आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे मॅडम यांनी घेतल्या या आगळ्या वेगळ्या हळदी-कुंकू उपक्रमाचे कौतुक करत पुणे मेट्रो मध्ये बसायला व फोटो घ्यायला मिळाले त्याबद्दल समाधान व्यक्त केले. महा मेट्रो च्या अधिकाऱ्यांनी उपस्थित आपली सखी सभासदांना मेट्रो च्या तिकीट पासून तसेच पिंपरी – चिंचवड ते शिवाजीनगर मेट्रो प्रवास कसा असेल, पुणे मेट्रोने काय – काय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत याबद्दल माहीती दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *