मंडप डेकोरेटर व्यवसायिक आर्थिक संकटात : कार्यक्रमास जागेच्या ५० % आसन क्षमतेने परवानगी देण्यात यावी यासाठी आंबेगाव तहसिलदारांना निवेदन

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२७ जानेवारी २०२२

आंबेगाव


करोनाच्या साथीमुळे आंबेगाव तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून लॉन्स, मंगल कार्यालयांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्या व्यावसायिंकासह त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. सर्व प्रकारच्या सामाजिक समारंभासाठी मंडम डेकोरेटर ,मंगल कार्यालय , लॉन,बँक्वेट हॉल मध्ये कार्यक्रम करण्यासाठी जागेच्या ५० % आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी मंडम ओनर्स वेलफेअर असोसिएशन आंबेगावच्या वतीने आंबेगाव तालुक्याचे तहसिलदार रमा जोशी यांना निवेदन देण्यात आले.

मार्च २०२० पासुन कोविड-१९ कोरोना महामारीच्या प्रार्दूभावामुळे राज्यात मंडप ,मंगल कार्यालय, लॉन , बँक्वेट हॉल धारकांवर ५० लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याचे निर्बंध टाकण्यात आले व ते आज ही लागु आहे गेल्या दोन वर्षापासून मंडम व्यवसायीक शासनाच्या नियमांचे पालन करून शासनास वेळोवेळी सहकार्य करत आहे तरी देखिल तातडीने आमच्या मागण्या माण्य कराव्या अशी मागणी आपल्या निवेदनातुन या व्यावसायिकांनी केली आहे.

या प्रसंगी अध्यक्ष -सुरेंद्र फदाले, उपाध्यक्ष -विठ्ठल करंडे ,सचिव -अंकुश हुले, खजिनदार – संजय कडधेकर, सदस्य -गणेश निघोट, गणेश भोर ,सागर पातकर,अजय भोजने,सप्नील शिंदे,सदाशिव केदारी,राहूल झोडगे,अशोक वाळूंज, बाळू चासकर,विठ्ठल पोखरकर, दिनकर थोरात ,राहूल झोडगे , स्वप्नील शिंदे आदिच्या उपस्थित सर्व मंडम व्यवसायिकांनी आंबेगाव तालुक्याचे नायब तहसिलदार ए.बी गवारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.