मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
२७ जानेवारी २०२२

ओझर


मांजरी बु: मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.केतन डुंबरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदआबा घुले, साधना सहकारी बँकेचे चेअरमन रमेश घुले, प्राचार्य डॉ.रितेश पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *