जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२६ जानेवारी २०२२

बेल्हे


जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा झाला.बेल्हे, साकोरी, निमगाव सावा, गुंजाळवाडी,आणे, पेमदरा,नळवणे,जाधववाडी,तांबेवाडी, निमगाव सावा, मंगरूळ पारगाव, राजुरी पूर्व भागातील सर्व गावांत गावातील ग्रामपंचायत, सर्व शाळा,महाविद्यालये, सरकारी दवाखाने,जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून ध्वजारोहण करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता शाळकरी विद्यार्थी सदर कार्यक्रमास मुकली आहे. घरी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेतील ध्वजारोहनाचा आनंद ऑनलाईन पद्धतीने घेतला. बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या दहावी व अकरावी च्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य करत तसेच लेझीमच्या तालावर राष्ट्रध्वजाला सलामी दिली. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, संचालक भास्कर पवार, राम गटकळ,विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे,उपप्राचार्य के.पी.सिंग, शिक्षक, काही विद्यार्थी उपस्थित होते.